rashifal-2026

देवेंद्र भुजबळ यांना बिझनेस एक्सप्रेस श्री पुरस्कार प्रदान

Webdunia
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती - वृत्त व जनसंपर्क) देवेंद्र भुजबळ यांना प्रशासकीय साहित्य सेवा प्रवर्गातील यंदाचा राज्यस्तरीय बिझनेस एक्सप्रेस श्री पुरस्कार - 2016प्रख्यात साहित्यिक प्रा. व. बा. बोधे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. माधवनगर रोडवरील डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन हॉल येथे आयोजित कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. 
 
यावेळी मुंबई विद्यापीठ लोककला विभाग प्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे, फॅमचे माजी उपाध्यक्ष सनतकुमार आरवाडे, उद्योजक पुष्पदंत दोड्डणवर, श्री फाऊंडेशनचे कार्यकारी विश्वस्त ए. आय. मुजावर आदि मान्यवर उपस्थित होते.
 
श्री. भुजबळ म्हणाले, बदलत्या परिस्थितीनुसार, मुलामुलींच्या आवडीनुसार त्यांना त्यांचे क्षेत्र निवडू द्या. आपल्या इच्छा आकांक्षा त्यांच्यावर लादू नका. त्यांच्यावर तणाव, दबाव निर्माण करू नका. पुढील जीवन आनंदाचे होण्यासाठी त्यानुसार करिअर निवडा. विद्यार्थ्यांनी महान्यूजवरील करिअरविषयी असणाऱ्या "करियरनामा" या सदरातील माहितीचा उपयोग करून स्वत:ची प्रगती साधावी. या सदरामध्ये नाविन्यपूर्ण क्षेत्रांतील संधींची माहिती दिली जाते. पारंपरिक अभ्यासक्रमाचा विचार करताना नवनवीन येऊ घातलेल्या अभ्यासक्रमांचाही मार्ग चोखाळावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
 
सांगली येथील व्यापार उद्योग क्षेत्राला वाहिलेल्या साप्ताहिक बिझनेस एक्सप्रेस श्री फाऊंडेशन या विश्वस्त संस्थेच्या वतीने दरवर्षी श्री पुरस्कार देण्यात येतो. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती- वृत्त व जनसंपर्क) देवेंद्र भुजबळ यांच्या प्रशासकीय साहित्य सेवेतील कार्याची दखल घेऊन या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले आहे. पुरस्काराचे यंदाचे हे 21 वे वर्ष आहे. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील लोककला, बँकिंग, उद्योग, शिक्षण, साहित्य क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रातील बांगलादेशी आणि रोहिंग्या स्थलांतरितांची माहिती सार्वजनिक करण्याची काँग्रेसची मागणी

LIVE: संजय राऊत यांच्या मुंबई बंद करण्याच्या विधानाला फडणवीसांचे प्रत्युत्तर

IND vs NZ: भारताने पहिला एकदिवसीय सामना चार विकेट्सने जिंकला

इराणमध्ये सरकारविरोधी निदर्शने सुरूच, हिंसाचारात 538 जणांचा मृत्यू

राजमाता जिजाऊसाहेब भोसले जयंती विशेष

पुढील लेख
Show comments