Festival Posters

शेतकऱ्यांना अधिवेशनापूर्वी आर्थिक मदत न दिल्यास अधिवेशन चालू देणार नाही - धनंजय मुंडे

Webdunia
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018 (09:31 IST)
राज्यात यावर्षी १९७२ सालापेक्षाही भीषण #दुष्काळ असल्याने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रूपये मदत देण्याची गरज आहे. ही मदत अधिवेशनापूर्वी न दिल्यास अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला आहे. धनंजय मुंडे हे मागील ४ दिवसांपासून दुष्काळी भागाचा दौरा करत गावकऱ्यांशी व शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. आज त्यांनी अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदुर व पट्टीवडगाव सर्कलमधील ४२ पेक्षा जास्त गावांमधील नागरिक, शेतकरी यांच्याशी संवाद साधला व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
 
२०१३ मध्ये आलेल्या नैसर्गिक संकटाच्या वेळी तत्कालीन आघाडी सरकारने हेक्टरी २५ हजार रूपये मदत दिली होती. यंदा अधिक बिकट परिस्थिती असल्याने यावेळी ५० हजार रूपये हेक्टरी मदत देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. मागच्या वर्षीचे बोंडअळीची नुकसानभरपाई, वीजबील माफ, १०० टक्के कर्जमाफीची अमलबजावणी आणि मागेल तिथे टँकर, दावणीला चारा आदी मागण्याही त्यांनी केल्या. बीड जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या पैशांवर व्याज खात आहे. त्यांची ही कृती म्हणजे मढ्यावरचे लोणी खाण्याचा प्रकार असल्याचीही टीका मुंडे यांनी केली.
 
यावेळी ज्येष्ठ नेते किसनराव बावणे, मजूर फेडरेशनचे अध्यक्ष बन्सीअण्णा सिरसाट, राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी विधानसभा अध्यक्ष गोविंदराव देशमुख, माऊली जाधव, शिवहार भताने, बाळासाहेब देशमुख, तानाजी देशमुख, गणेश देशमुख, मच्छिंद्र वालेकर, मुस्ताक पटेल, पांडुतात्या हारे, शिवाजीराव सिरसाट, बळवंतराव बावणे, बालासाहेब राजमाने, गंडले साहेब, चंद्रकांत वाकडे, विश्वंभर फड, सत्यजित सिरसाठ, धनंजय शिंदे, चंद्रकांत चाटे, काशिनाथ कातकडे व परिसरातील सर्व सरपंच, घाटनांदुर येथील ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी व नागरिक आदी उपस्थित होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रात ऊर्जा व्यवस्थापनात एआयचा वापर

बल्लारशाह ते मुंबई दरम्यान नवीन ट्रेनची घोषणा करण्यात आली

२० ते २२ एप्रिल दरम्यान महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

पुण्यात ज्येष्ठ नागरिकांना ३०% मालमत्ता कर सवलत मिळणार असल्याची बातमी खोटी, पुणे महानगरपालिकेने स्पष्टीकरण दिले

सक्तीच्या धर्मांतराच्या आणखी एका प्रकरणामुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली

पुढील लेख
Show comments