देशाच्या सीमेवर संरक्षण करत असेलेल्या जवानांच्या पत्नींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या विधानपरिषदेतील भाजपाचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांचं निलंबन कायम ठेवले आहे. फक्त एका तासाआधी विधान परिषदेत परिचारकांवरील निलंबन मागे घेण्यात आल, परिचारक यांच्या निलंबनानंतर विधान परिषदे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी जोरदार आक्षेप नोंदवला होता. धनंजय मुंडे यांनी या निर्णयाचा विरोध केला तर रावतेंनी सभापती रामराजेंच्या दालनात जाऊन आक्षेप नोंदवला आहे. तसेच सोबतच आमदार विनायक मेटेंनीही यावर त्यांचा विरोध दर्शवला होता, विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशांत परिचारक यांचं मागे घेतलेलं निलंबन सरकारने कायम ठेवले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचार होता तेव्हा सोलापूर येथील पंढरपूरमधील भोसे यांच्या प्रचारसभेत विरोधकांवर परिचारिक यांनी टीका केली होती आणि बोलतांना सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या पत्नींबाबत परिचारक यांनी अत्यंत अपमानास्पद, आक्षेपार्ह विधान केलं होतं. ते म्हणाले होते की “पंजाबमधील जवान वर्षभर सीमेवर असतो तर त्याची बायको इकडे गर्भवती होते. तुम्हाला मुलगा झाला असे जवानाला पत्र येतं. वर्षभर तो गावाकडे आलेला नसतो मात्र तिकडे सीमेवर तो आनंदात पेढे वाटतो. राजकारणही असंच आहे”, असे संतापजनक वक्तव्य परिचारक यांनी केलं होते.