Marathi Biodata Maker

धनंजय मुंडेंची आमदारकीही धोक्यात?

Webdunia
बुधवार, 5 मार्च 2025 (17:53 IST)
अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा 4 मार्च रोजी दिला. त्यांच्यावर बीडचे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणि कृषी खात्यातील कथित घोटाळ्याच्या आरोपांमुळे चर्चित असलेले धनंजय मुंडे यांनी सहाय्यक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी यांच्यासह सागर बंगल्यावर जाऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपला राजीनामा दिला. फडणवीसांनी त्यांचा राजीनामा स्वीकार केल्याचे पत्रकारांना सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडे यांना कार्यमुक्त केल्याची अधिकृत घोषणा केली. 
ALSO READ: धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यासाठी ८० दिवस का लागले? सुप्रिया सुळे यांचा प्रश्न
राजीनामा दिल्यानन्तर आता मुंडे यांची आमदारकी राहणार का? हा प्रश्न उद्भवत आहे. आता राजीनामा दिल्यावर धनंजय मुंडे हे अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सभागृहात उपस्थित राहणार का हे पाहावे लागणार आहे. मात्र अद्याप तरी धनंजय मुंडे यांच्या आमदारकीला कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात येत आहे. 
ALSO READ: अबू आझमी यांनी औरंगजेबावरील त्यांचे विधान मागे घेतले, रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले
सध्या तरी धनंजय मुंडे यांना सह आरोपी करणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यांच्या विरुद्ध कोणताही ठोस पुरावा चार्जशीट मध्ये नसल्याचे सांगण्यात येत आहे.आता पुढे काय होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 
Edited By - Priya Dixit
ALSO READ: मंत्र्याच्या पीएला फाईल मंजूर करण्यासाठी लाच देण्याचा भाजप नेत्याचा आरोप

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

यवतमाळ: कत्तलीसाठी तेलंगणात नेण्यात येत असलेल्या जनावरांची सुटका; तीन तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल

इंधन वाचवण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी अमृता फडणवीस यांनी सायकल चालवण्याचा अवलंब केला

LIVE: विदर्भातील ६ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट, ९ जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा

Veer Savarkar Jayanti 2026 Messages in Marathi स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन

Veer Savarkar Jayanti 2026 Speech in Marathi स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती भाषण मराठी

पुढील लेख
Show comments