Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मध्यस्थींच्या मार्फत सामंजस्यानं वाद सोडवणार, धनंजय मुंडे यांच्याकडून हमीपत्र सादर

Webdunia
गुरूवार, 28 जानेवारी 2021 (21:50 IST)
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलेनं आपासातील वाद मध्यस्थींच्यामार्फत सामंजस्यानं सोडवण्यास तयार असल्याचं हमीपत्र  मुंबई उच्च न्यायालयात सादर केलं. या महिलेकडनं धनंजय मुंडे यांना दोन मुलं असून त्यांना त्यांच्या कुटुबियांची मान्यता असल्याची जाहीर कबुली मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी जाहीरपणे दिली आहे. न्यायमूर्ती ए.के. मेनन यांच्यापुढे यावर सुनावणी झाली.
 
 हायकोर्टात या दोन्ही बाजूंनी आपापसातला वाद मध्यस्थाच्या माध्यमातून सोडवण्यास तयारी असल्याचं हमीपत्र हायकोर्टात सादर केलं. या मध्यस्थाचा सारा खर्च धनंजय मुंडे करणार असल्याचंही या हमीपत्रात म्हटलेलं आहे. डिसेंबर महिन्यात हा दावा मुंडे यांनी हायकोर्टात केल्यानंतर या महिलेच्या बहिणीनं धनंजय मुंडेवर बलात्काराचा आरोप लावत त्यांच्याविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र त्यानंतर काही दिवसांत ही तक्रार मागे घेत असल्याचं पोलिसांना लेखी कळवलं होतं.
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments