Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गरिबांचे फाटलेले संसार शिवण्यासाठी मुलीच्या लग्नात कास्तकार विधवांना शिलाई मशीनचे वाटप

Webdunia
सोमवार, 16 मे 2022 (08:44 IST)
यवतमाळ दिग्रस येथील सामाजिक कार्यकर्ते व उपक्रमशील शिक्षक मजहर अहेमद खान रहेमान खान यांनी  आपल्या मुलीच्या लग्नात आत्महत्याग्रस्त कास्तकारांच्या शेतकरी  विधवांना शिलाई मशीनचे वाटप करून समाजासमोर आदर्श प्रस्थापित केला आहे . एवढेच नव्हे तर त्यांनी येणाऱ्या पाहुण्यांचे भारतीय संविधानाच्या प्रती इतर पुस्तके व रोपटे देऊन स्वागत देखील केले .

दिग्रस शहरासह तालुक्यात सामाजिक , शैक्षणिक , सांस्कृतिक व जनहिताच्या कार्यासाठी परिचित असलेले अंजुमन उर्दू विद्यालयाचे सहायक शिक्षक मजहर अहेमद खान यांची कन्या मुनव्वर ताज हिचा विवाह असेगांव { जि. वाशीम } येथील सरदार खान शाहनूर खान यांच्यासोबत पार पडला . लग्न मंडपात त्यांनी संगीता अशोक तुमाने , माला दिनेश राठोड , अंजुम परवीन शेख अय्युब , सुनीता प्रल्हाद मोहकर व संगीता अरुण लोखंडे या आत्महत्याग्रस्त कास्तकारांच्या विधवांना उदरनिर्वाहासाठी शिलाई मशीनचे वाटप करून प्रेरणा व आदर्शत्वाचा अभिनव पायंडा रचला . एवढेच नव्हे तर त्यांनी सर्व पाहुण्यांचे भारतीय संविधान , “शिवरायाचे निष्ठावंत मुस्लीम सैनिक” , स्त्रीभ्रूणहत्या आदी विषयावरील पुस्तके व रोपटे देऊन स्वागत केले .

मोठ्या मुलीच्या लग्नात देखील त्यांनी अपंगांना तीनचाकी साईकलींचे वाटप केले होते . त्यांचा मुलगा हस्सान अहेमद खान याने देखील महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणेतर्फे घेण्यात आलेल्या पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती आत्महत्याग्रस्त कास्तकांरांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी दान दिली , हे येथे उल्लेखनीय !गरिबांचे फाटलेले संसार शिवण्यासाठी मुलीच्या लग्नात कास्तकार विधवांना शिलाई मशीनचे वाटप .

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

भिवंडीतील भंगार गोदामाला भीषण आग,कोणतीही जीवितहानी नाही

LIVE:निवडणूक निकालानंतर व्हीबीए कोणाला पाठिंबा देईल, प्रकाश आंबेडकर यांचा खुलासा

निवडणूक निकालानंतर व्हीबीए कोणाला पाठिंबा देईल, प्रकाश आंबेडकर यांचा खुलासा

Baba Siddique Murder: बाबा सिद्दीक हत्याकांड प्रकरणात अकोल्यातून 26 वी अटक

आईने आपल्या दोन निष्पाप मुलांची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या केली

पुढील लेख
Show comments