Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शेतकऱ्यांना त्रास देऊ नका, नाहीतर ........ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महावितरण अधिकाऱ्यांना तंबी

Webdunia
गुरूवार, 26 ऑक्टोबर 2023 (20:42 IST)
Do not disturb the farmers राज्यात पावसाने मारलेल्या दडीमुळे अनेक ठिकाणी शेतीपिकं पाण्याअभावी वाया गेली आहेत. ऑगस्ट महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पावसाने ओढ दिल्याने वाया गेला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची परिस्थिती चिंताजनक आहे. अशातच महावितरणच्या ठिसाळ कारभाराचा फटकाही शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे.  दरम्यान याच मुद्द्यावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलंच फटकारलं आहे.
 
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर दिसत आहेत. लातूरच्या औसा इथं शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
 
यावेळी अभिमन्यू पवार यांनी महावितरणच्या कारभाराचा शेतकऱ्यांना कसा फटका बसतोय याची माहिती देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन दिली. यावर देवेंद्र फडणवीस यांनीही फोनवरुन अधिकाऱ्यांना चांगलीच तंबी दिली.
 
दरम्यान शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा करा, अन्यथा सस्पेंड करेन. शेतकरी आधीच अडचणीत आहे. शेतकऱ्यांना आणखी अडचणीत आणू नका. तात्काळ त्यांना विद्युत ट्रान्सफॉर्मर बसवून द्या, अशा सूचनाही यावेळी देवेंद्र फडवणीस यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Navratri 2024 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवी मंदिरे

Ekadashi Shradh 2024 पितरांच्या उद्धारासाठी एकादशी श्राद्ध नक्की करावे, सद्गती मिळेल

घरात कटकटी होत आहेत? तर हे 5 प्रभावी उपाय नक्की करून पहा

कोणी मनुका खाऊ नये? या लोकांनी रिकाम्या पोटी किशमिश खाल्ल्यास समस्या वाढू शकतात

केवळ फायदेच नाही, अंडी खाल्ल्याने होऊ शकतात आरोग्याला हे 6 नुकसान

सर्व पहा

नवीन

कोरोना महामारीदरम्यान मृत्यू झालेल्या 5 कोरोना योद्ध्यांना दिल्ली सरकार प्रत्येकी 1 कोटी रुपये देणार

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले

दिल्लीहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये प्रवाशांच्या जेवणात आढळले झुरळ

मुंबई सिनेट निवडणुकामध्ये शिवसेनाने यश मिळवला, ही तर विजयाची सुरुवात -आदित्य ठाकरे

अरविंद केजरीवाल लवकरच मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार

पुढील लेख
Show comments