Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डॉ. हर्षवर्धन यांची उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा; ऑक्सिजनसह सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन

Webdunia
रविवार, 18 एप्रिल 2021 (11:18 IST)
राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात वाढत चाललेला तणाव कमी करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे. डॉ. हर्ष वर्धन यांनी शनिवारी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. राज्यातील स्थिती जाणून घेत त्यांनी पुन्हा एकदा, राज्याला शक्य ती सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलं.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी नुकतंच बोलून त्यांना आवश्यक असलेला वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरेसा आणि अखंडित पुरवठा करण्याचं आश्वासन पुन्हा एकदा दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर आवश्यक असलेले सर्व सहकार्य औषधी, उपचार पद्धती आणि इतर सोयीसुविधा पुरवण्याचं आस्वासन दिल्याचंही डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं.
 
डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्रातील स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अतिरिक्त 1121 व्हेंटिलेटरही दिले जात असल्याची माहितीही दिली. तसंच उद्धव ठाकरे यांच्याशी कोविडच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपचार आणि इतर बाबींवरही त्यांनी चर्चा केली. या संकटाचा सामना करण्यासाठी टेस्ट, ट्रॅक, ट्रिट, कोविड योग्य वर्तन आणि लसीकरण या पाच स्तंभांवर लक्ष केंद्रीत करण्याचा पुनरुच्चार केल्याचंही डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं आहे.
 
राज्यात कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजनची मागणी आणि उपलब्धता किंवा पुरवठा यातील फरकामुळं राज्यानं केंद्राकडं ऑक्सिजनची मागणी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात पंतप्रधानांना फोनही केला होता. यावरून अनेक आरोप प्रत्यारोप झाले. त्यानंतर आता खुद्द केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनीच उद्धव यांच्याशी याबाबत चर्चा केल्याची माहिती दिली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

धरणात बुडून आई आणि मुलीचा वेदनादायक मृत्यू

सांगली जिल्ह्यात कार कृष्णा नदीत पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पराभव टाळला,लक्ष्यही उपांत्यपूर्व फेरीत

पुढील लेख
Show comments