Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रात्री 3 वाजता कळलं की प्रवाशांना वाऱ्यावर सोडून बसचालक पळून गेला

drive leave passenger in bus in midnight on mumbai goa road
Webdunia
शनिवार, 18 सप्टेंबर 2021 (10:07 IST)
एका विचित्र घटनेत मुंबई-गोवा महामार्गावर सिंधुदुर्गातील बांद्याहून मुंबईला येणार्‍या एका खासगी बसच्या चालकाने प्रवाशांना बसमध्ये सोडून जंगलात पळ काढला. ड्रायव्हरने बस सोडून पलायन केले तेव्हा सर्व प्रवासी गाढ झोपेत होते. यामुळे मोठी खळबळ उडाली.
 
काळभैरव ट्रॅव्हल्सच्या खासगी बसचालकाने सर्वांनाच हैराण केलं. थांबलेल्या बसमध्ये जेव्हा रात्री 3 वाजेच्या सुमारास प्रवाशाला जाग आली तेव्हा बस का थांबलीय हे पाहण्यासाठी तो सीटवरुन उठून पुढे आल्यावर त्याला ड्रायव्हर दिसला नाही. काही वेळ वाट पाहिली तरी चालक आला नाही म्हणून त्या प्रवाशाने इतर प्रवशांना उठविण्यास सुरु केले.
 
नंतर प्रवाशांनी पोलिसांची संपर्क साधला. पहाटे चिपळूण पोलिसांचे एक पथक प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दाखल झाले मात्र बसचा मालक, बुकिंग एजंट यांचे फोन लागत नसल्यामुळे खळबळ उडाली.

Photo: Symbolic

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

शेख हसीना आणि त्यांच्या मुलाविरुद्ध नवीन अटक वॉरंट जारी

चालत्या ट्रेनमध्ये पैसे काढण्यासाठी एटीएमची सुविधा,पंचवटी एक्सप्रेसमध्ये सुरू

मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी, पोलीस नियंत्रण कक्षाला आला निनावी फोन

तो सेल्फी काढण्याच्या बहाण्याने जवळ बोलावून शरीराला स्पर्श करत असे, मुंबईत केईएम रुग्णालयातील डॉक्टरवर लैंगिक छळाचा आरोप

LIVE: नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी सद्भावना शांती मार्च काढला

पुढील लेख
Show comments