Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यावर ड्रोन हल्ल्याचं सावट, सतर्कतेचा इशारा

राज्यावर ड्रोन हल्ल्याचं सावट, सतर्कतेचा इशारा
, बुधवार, 12 जानेवारी 2022 (16:19 IST)
सध्या राज्यावर दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे. प्रजासत्ताक दिन काहीच दिवसांवर आले आहे. अशा परिस्थितीत राज्यात ड्रोनच्या माध्यमातून हल्ला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या साठी केंद्रीय तपास यंत्रणेकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे .मुंबईसह राज्यातील प्रमुख शहर अलर्टवर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी डार्कनेटचा वापर करून ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्याचा कट रचत आहे. त्यासाठी नागरिकांना सचेत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 
ड्रोन ने केला जाणाऱ्या हल्ल्यात 20 किमी ते 30 किमी अंतरावर देखील निशाणा साधता येऊ शकतो. 
 राज्याच्या सायबर विभागाने दिलेल्या अहवालानुसार दहशवादी संघटनेचे व्यक्ती ड्रोनने हल्ला करण्याबाबत डार्क नेट वर चर्चा करत असतात.सध्या राज्यात ड्रोनविरोधी यंत्रणा नाही.ती लवकरात लवकर बसवून घ्यावी अशी मागणी केली जात आहे.  नागरिकांना या बाबत सतर्कतेचा सूचना तपास यंत्रणे कडून देण्यात आल्या आहेत

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमेरिकेत कोरोनाचा उद्रेक, दररोज संक्रमितांची संख्या पुन्हा दहा लाखांच्या पुढे, डझनभर अमेरिकन उड्डाणे निलंबित