Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

समुद्रात क्रूझवर मध्यरात्री सुरू होती ड्रग्ज पार्टी, एनसीबीच्या धाडीत 10 जण ताब्यात

समुद्रात क्रूझवर मध्यरात्री सुरू होती ड्रग्ज पार्टी  एनसीबीच्या धाडीत 10 जण ताब्यात
Webdunia
रविवार, 3 ऑक्टोबर 2021 (10:02 IST)
मुंबईच्या अंमली पदार्थ नियंत्रण पथकानं शनिवारी मध्यरात्री मोठी कारवाई केली आहे. समुद्राच्या मध्यभागी एका क्रूझवर सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीवर धाड टाकत 10 जणांना एनसीबीनं ताब्यात घेतलं. यामध्ये एका अभिनेत्याच्या मुलाचा समावेश असल्याचं वृत्तामध्ये म्हटलं आहे.मुंबईहून गोव्याला निघालेल्या क्रूझवर ही पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळं एनसीबीचे अधिकारी प्रवासी बनून क्रूझवर गेले. क्रूझ समुद्राच्या मध्यभागी गेल्यानंतर ही पार्टी सुरू झाली होती, अशी माहिती एनसीबीनं दिली.

<

#UPDATE | Children of prominent Bollywood actors being investigated, according to NCB officials

— ANI (@ANI) October 2, 2021 >ड्रग्जचं सेवन सुरू केल्यानंतर एनसीबीच्या पथकानं या सर्वांना रंगेहाथ अटक केली. त्यामध्ये एका अभिनेत्याच्या मुलाचाही समावेश होता. शनिवारी निघालेली ही क्रूझ सोमवारी मुंबईला परतणार होती, अशी माहिती मिळाली आहे.
पोलिसांनी कारवाई केलेली क्रूझ काही दिवसांपूर्वीच सुरू झाली होती. तसंच या पार्टीसाठी क्रूझचं तिकिट 80 हजार रुपये एवढं असल्याचंही काही माध्यमांच्या वृत्तात म्हटलं आहे.
 

संबंधित माहिती

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

हिंदू नववर्षानिमित्त फडणवीस सरकारने दिली मोठी भेट, १ एप्रिलपासून मिळणार स्वस्त वीज

LIVE: हिंदू नववर्षानिमित्त फडणवीस सरकारने दिली मोठी भेट

मुंबईत शास्त्रीय गायकाला १८ दिवस डिजिटल अटकेत ठेवत लुटले

कोकणात यलो अलर्ट, मुसळधार पावसासह चक्रीवादळाचा इशारा

मुंबईत भीषण अपघात, टॅक्सी चालक आणि महिलेचा मृत्यू

पुढील लेख
Show comments