Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दारूड्या बापाने केला मुलाचा खून!

Webdunia
बुधवार, 31 मार्च 2021 (08:05 IST)
दारुड्या बापाने नशेत आपल्या पोटच्या मुलाचा डोक्यात लोखंडी गज घालून खून केल्याची खळबळजनक घटना अहमदनगर आखेगाव (ता.शेवगाव) येथे मंगळवारी  पहाटे घडली.पत्नी ताराबाई करपे हिने मुलाच्या हत्येबाबत आपल्या पतीविरुद्ध पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे आखेगाव परिसर हादरला आहे. घटनेनंतर दारुड्या बाप पसार होण्यात यशस्वी झाला.
 
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, आपला पती गोरख अनेक दिवसापासून दारूच्या आहारी गेल्याने घरात कायम किरकोळ स्वरूपाचे वाद होत होते, असे ताराबाई करपे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.सोमवारी (दिं.२९ रोजी) तो दारू पिऊन घरी आला. सांयकाळी आपण शेतातून घरी आल्यानंतर आज होळीचा सण असुनही तुम्ही सणासुदीचे दारू का पिवून आलात ? असे विचारले. यावर रागावलेला पती आपल्याला मारण्याकरीता पुढे आला.
 
पंरतु, मुलगा सोमनाथ मध्ये आल्याने आपला मार वाचला. त्यावेळी गोरखने मुलाला शिवीगाळ केली व तो घरातून निघून गेला. त्यानंतर ताराबाई व मुलगा सोमनाथ हे दोघे जेवण करुन रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आखेगाव शिवारातील गट नं.३२४ या त्यांच्या शेतातील ऊसाला पाणी देण्यासाठी गेले.
 
सोमनाथ हा ऊसाला पाणी देत होता. तर, त्याची आई ताराबाई ऊसाच्या शेवटच्या टोकाला पाणी पोहचल्याचे त्याला आवाज देऊन सांगत होती. त्यांच्यात साधारण १०० फुटाचे अंतर होते. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास सोमनाथच्या ओरडल्याचा आवाज आल्याने ताराबाई पळत त्याच्याकडे गेली, त्यावेळी गोरख हा मुलास डोक्यावर लोखंडी गजाने मारत असल्याचे तिने पाहिले. वर्मी घाव लागल्याने सोमनाथ बांधावर कोसळला. अति रक्तस्रावामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

मोठी बातमी! शपथविधीची तारीख उघड! मुख्यमंत्र्यांचे नावही आली आले

रेल्वे ट्रॅकवर काम करणाऱ्या 2 मजुरांचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू

LIVE: भाजपची तयारी जोरात, हे पाच प्रमुख चेहरे मंत्रिमंडळात राहणार!

भाजपची तयारी जोरात, हे पाच प्रमुख चेहरे मंत्रिमंडळात राहणार!

गोंदियात शिवशाही बस उलटून 11 प्रवाशांचा मृत्यू, तर 23 जखमी

पुढील लेख
Show comments