Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तपासात संजय राऊत यांच्याविषयी ईडीला झाले अनेक धक्कादायक खुलासे

Webdunia
शुक्रवार, 19 ऑगस्ट 2022 (15:25 IST)
मूळ शिवसेना पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत हे सुद्धा तुरुंगात आहेत. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांना पत्रा चाळ प्रकरणी अटक केली आहे. ईडीला राऊतांच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समजल्या आहेत. मुंबईतील एका बिल्डरच्या मालकीच्या दोन आलिशान गाड्यांचा वापर राऊत करीत असल्याचे ईडीला चौकशीत स्पष्ट झाले आहे.
 
आर्थिक गुन्हे शाखेतील माहितीच्या आधारे ईडीने या प्रकरणी तपासाला सुरुवात केली. ईडीने गैरव्यवहाराच्या रकमेचा माग काढला असता एचडीआयएलकडून प्रवीण राऊतच्या खात्यात सुमारे १०० कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. त्याबाबत आणखी माहिती घेतली असता, ही रक्कम पुढे प्रवीण राऊत यांनी त्यांचे जवळचे सहकारी, कुटुंबातील सदस्य, त्यांच्या व्यावसायिक संस्था इत्यादींच्या विविध खात्यांमध्ये वळती केल्याचे आढळून आले. त्यानंतर हा तपास शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा व त्यानंतर संजय राऊत यांच्यापर्यंत पोहोचला.
 
गुन्ह्यातून मिळालेल्या रकमेपैकी ८३ लाख रुपये प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी प्रवीण राऊत यांच्याकडून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना २०१० ते २०१२च्या दरम्यान १ कोटी ६ लाख रुपये मिळाल्याचे उघड झाले आहे. ही रक्कम वर्षा राऊत यांनी दादर येथे सदनिका खरेदीसाठी वापरली, असा आरोप आहे. याशिवाय अलिबाग येथील किहीम समुद्रकिनारी ८ भूखंडदेखील संजय राऊत यांचे एकेकाळचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या पत्नी स्वप्ना पाटकर व संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या नावे खरेदी करण्यात आले.
 
जमिनीच्या व्यवहारात नोंदणीकृत मूल्याव्यतिरिक्त विक्रेत्याला रोख रक्कम देण्यात आली होती. ही संपत्ती आणि प्रवीण राऊत यांच्या इतर मालमत्तेची ओळख पटल्यानंतर प्रवीण राऊत आणि इतरांच्या मालमत्तांवर टाच आणण्यात आली होती. याशिवाय रविवारी ईडीने राऊत यांच्या भांडुप येथील मैत्री बंगल्यावर छापा टाकला. त्यावेळी घरातून साडे अकरा लाखांची रोख जप्त करण्यात आली. त्यामुळे सदनिका, किहिम येथील भूखंड व रोख रक्कम याबाबत राऊत यांची ईडीने चौकशी केली.
 
श्रद्धा डेव्हलपर्सच्या संचालकांच्या मालकीच्या यो दोन लक्झरी गाड्यांचा वापर संजय राऊत आणि त्यांचं कुटुंबीय करत होते. संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत यांच्या मतदारसंघात श्रद्धा डेव्हलपर्सचे अनेक प्रकल्प आहेत. ईडीने मुंबईसह अनेक ठिकाणी छापे टाकले. यामध्ये पूर्व उपनगरातील रिअल इस्टेट डेव्हलपरचाही समावेश होता. पत्रा चाळ प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. संजय राऊत आणि त्यांचं कुटुंब श्रद्धा डेव्हलपर्समधील संचालाकांच्या मालकींच्या गाड्यांचा वापर करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर हे छापे टाकण्यात आले.
 
ईडीच्या पथकाने श्रद्धा डेव्हलपर्सच्या मुलुंडमधील कार्यालयातील कागदपत्रे आणि कॉम्प्युटरची छाननी केली. श्रद्धा डेव्हलपर्सचे सुनील राऊत यांच्या मतदारसंघात येणाऱ्या भांडूप, मुलुंड, विक्रोळीत अनेक प्रकल्प सुरु आहेत. ३१ जुलैला निवासस्थानी छापा टाकण्यात आल्यानंतर ईडीला संजय राऊत आणि त्यांचं कुटुंब श्रद्धा डेव्हलपर्समधील संचलाकांची मालकी असलेल्या दोन आलिशान गाड्यांचा वापर करत असल्याची माहिती मिळाली होती.
 
ईडीने अवनी इन्फ्रास्ट्रक्चर वरही छापा टाकला होता . ही कंपनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि पत्रा चाळ प्रकरणातील मुख्य आरोपी प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी यांनी सुरु केली होती. ईडीने संजय राऊत यांना १ ऑगस्टला अटक केली होती, यानंतर ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले आहे. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांचीही ईडीने चौकशी केली आहे.

संबंधित माहिती

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

बुरख्याच्या वादावर माधवी लता बोलल्या कोणाला घाबरत नाही

पाकिस्तानकडे बांगड्याही नाहीत... पंतप्रधान मोदींनी भारत आघाडीवर निशाणा साधला

मुंबईत 29 लाखांना विकले रीवा येथून चोरीला गेलेले सहा महिन्यांचे बाळ

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

पत्नीने वेळेवर जेवण न दिल्याने संतप्त पतीने कुऱ्हाडीने वार करून हत्या केली

पुढील लेख
Show comments