Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोना संकटाची मोठी झळ ही अर्थव्यवस्थेला बसली आहे, संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे - शरद पवार

कोरोना संकटाची मोठी झळ ही अर्थव्यवस्थेला बसली आहे, संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे -  शरद पवार
, गुरूवार, 30 एप्रिल 2020 (22:24 IST)
मुंबई-कोरोना संकटाची मोठी झळ ही अर्थव्यवस्थेला बसली आहे. कारण लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यापार, व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. याचा विपरित परिणाम राज्याच्या अर्थकारणावर होणार आहे. कारखाने, व्यापार, व्यवहार बंद आहेत. लोकांचे रोजगार बुडाले आहेत. यामुळे महाराष्ट्र आणि शासनाच्या अर्थकारणावर विपरित परिणाम होणार आहे, अशी चिंता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
 
शरद पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे लागणार आहे, असे ते म्हणालेत. जरी आर्थिक संकट ओढावणार असले तरी यावर तोडगा काढण्याची गरज आहे. देशभरात अनेक ठिकाणी आर्थिक संकट उभे राहणार असून त्यासाठी सर्वांनी एकत्रित चर्चा करुन मार्ग काढला पाहिजे. लॉकडाऊनमुळे ४० दिवसांपासून सगळे काही बंद आहे. कारखाने, व्यापार, व्यवहार बंद आहेत. लोकांचे रोजगार बुडाले आहेत. यामुळे अर्थकारणावर विपरित परिणाम होणार आहे.
 
मी सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकारचा २०२०-२०२१ चा जो अर्थसंलकल्प सादर केला होता, त्यात एकंदर राज्याचे महसूल उत्पन्न तीन लक्ष ४७ हजार कोटीच्या आसपास जाईल, असे चित्र दिसत होते. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे आज सुधारित  माहिती घेतली असता महसूलात तूट पडेल असे दिसत असल्याची चिंता व्यक्त केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमेरिकेमधून एक सकारात्मक बातमी कोरोना रेमडेसिवीर (Remdesivir) हे औषध करोनावर परिणामकारक ठरत असल्याचा दावा