Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रोहित पवारांवर ईडीची मोठी कारवाई

Webdunia
मंगळवार, 12 मार्च 2024 (09:21 IST)
महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांचा नातू रोहित पवार याच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. ईडीने ही कारवाई करत रोहितच्या मालकीच्या साखर कारखान्यातील 50 कोटींहून अधिक रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. कथित महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात केंद्रीय एजन्सीने ही कारवाई केली आहे.
 
ईडीने जप्त केलेली साखर कारखान्याची मालमत्ता औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड गावात असलेल्या कन्नड सहकारी साखर कारखाना लिमिटेडची आहे. या कारवाई अंतर्गत, एकूण 161.30 एकर जमीन, प्लांट, यंत्रसामग्री आणि इमारती मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत तात्पुरत्या स्वरुपात संलग्न करण्यात आल्या आहेत.
कन्नड एसएसके बारामती ॲग्रो लिमिटेडच्या मालकीची आहे. बारामती ॲग्रो लिमिटेड ही शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची कंपनी आहे.
 
ईडीच्या कारवाईवर राष्ट्रवादीने टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार म्हणाले की, ईडीची कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असून लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांना त्रास देण्यासाठी सरकार ईडीचा वापर करत आहे.
 
ईडीच्या कारवाईवर राष्ट्रवादीने टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार म्हणाले की, ईडीची कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असून लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांना त्रास देण्यासाठी सरकार ईडीचा वापर करत आहे.

Edited By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

IND Vs AUS: पर्थ कसोटीत भारताचा ऐतिहासिक विजय, ऑस्ट्रेलियाचा पराभव

Ipl mega auction : व्यंकटेश अय्यर आयपीएल इतिहासातील तिसरा सर्वात महागडा भारतीय बनला

मुलीच्या भावाने केले प्रियकराचे निर्घृण खून

कांतारा चॅप्टर 1 च्या स्टार कास्टच्या बसचा अपघात,अनेक जण गंभीर जखमी

भारतीय तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई, अंदमानच्या समुद्रामधून 5 टन ड्रग्ज जप्त

पुढील लेख
Show comments