Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महादेव ऑनलाईन गेमिंग ॲपवर ईडीचे छापे; 14 बॉलिवूडकर रडारवर, नेमकं प्रकरण काय?

Webdunia
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2023 (21:23 IST)
महादेव ऑनलाइन गेमिंग ॲपच्या कंपनीवर ईडीने छापेमारी टाकली आहे. या छापेमारीमध्ये 417 कोटी रुपयांची रक्कम गोठवली आहे. बॉलिवूडचे अनेक कलाकार सध्या ईडीच्या रडारवर आहेत. टायगर श्रॉफ, सनी लिओनी नेहा कक्कडसह अनेक कलाकार ईडीच्या रडारवर आहेत.  
 
नेमकं प्रकरण काय?
महादेव ऑनलाइन गेमिंग ॲपमध्ये मनी लाँड्रिंगसंदर्भात एका भव्य लग्नाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ मुख्य आरोपी सौरभ चंद्राकरच्या  लग्नसोहळ्यातील आहे. मुख्य आरोपी हा ॲपच्या संस्थापकांपैकी एक आहे. सौरभ चंद्रकरच्या लग्नसोहळ्याला अनेक कलाकार उपस्थित होते. या लग्नसोहळ्याचा व्हिडीओ आणि कलाकारांची यादी आता समोर आली आहे. टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, सनी लिओनी, कृष्णा अभिषेक, राहत फतेह अली यांची नावे देखील समोर आल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. संबंधित सेलिब्रिटींच्या चाहत्यांना देखील मोठी धक्का बसला आहे.
 
महादेव ऑनलाईन गेमिंग ॲपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने गेल्या काही दिवसांत मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी छापेमारी केली आहे. त्यादरम्यान त्यांनी 417 कोटी रुपयांची रक्कम गोठवली आहे. आता 14 बॉलिवूडकर ईडीच्या रडारवर आले आहेत.
 
महादेव ॲप प्रकरणातील एका आरोपीचा लग्नसोहळ्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. या सोहळ्याला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. लग्नाचा खर्च ईडीच्या स्कॅनरखाली असून गेमिंग ॲपवरुन बेकायदेशीर रोख रक्कम मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आला आहे.

Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

आईने आपल्या दोन निष्पाप मुलांची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या केली

Israel-Hamas War: 'गाझामधील मृतांची संख्या 44 हजारांच्या पुढे

पर्थ कसोटीपूर्वी रोहित शर्मा या दिवशी संघात सामील होणार

शिया मुस्लिमांना घेऊन जाणाऱ्या वाहनावर बंदूकधाऱ्यांचा प्राणघातक हल्ला, 50 ठार

रोहित पवारांचा आरोप- भाजप सदस्यांचा EVM स्ट्राँग रूममध्ये शिरण्याचा प्रयत्न

पुढील लेख
Show comments