rashifal-2026

ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीची धाड

Webdunia
बुधवार, 10 जानेवारी 2024 (10:42 IST)
ठाकरे गटाचे नेते आणि उद्धव ठाकरे यांची विश्वासू रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरी येथील घरी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) धाड टाकली आहे.  ईडीच्या पथकाने आज सकाळी वायकर यांच्या घरावर धाड टाकली.
 
ईडीच्या या पथकात 10 ते 12 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, सकाळी साधारण साडेआठच्या सुमारास ईडीचे पथक वायकर यांच्या घरी पोहोचले. त्यानंतर वायकर यांच्या घरी ईडीची झाडाझडती सुरु आहे.
 
वायकरांशी संबंधित सात ठिकाणांवर ईडीची छापेमारी सुरु असून यामध्ये त्यांच्या भागिदारांच्या घरांचाही समावेश आहे. जोगेश्वरीतील भूखंड घोटाळाप्रकरणी ईडीकडून ही धाड टाकण्यात आल्याचे समजते.
 
आता या धाडीत ईडीच्या हाती काही पुरावे लागतात का आणि त्या अनुषंगाने ईडी रवींद्र वायकर यांच्यावर अटकेची कारवाई करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकर यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे अनेक आरोप केले होते.
 
Edited By - Ratnadeep ranshoor 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: शिक्षकांनी टीईटीच्या आदेशाचा निषेध केला

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक, पुणे-लोणावळा लोकलसह अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द

रतन टाटा यांच्या आई सिमोन टाटा यांचे निधन

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी गिलला खेळण्याची मिळाली परवानगी

दाजींवर फिदा झाली मेहुणी, प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले

पुढील लेख
Show comments