Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवसेने नेते यशवंत जाधव यांना ईडी कडून समन्स

Yashwant Jadhav
, बुधवार, 25 मे 2022 (12:22 IST)
शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरात छापेमारी केल्यावर २ कोटी रोख, लॅपटॉप आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली होती. आता जाधव यांच्या अडचणीत वाढ झाली असून ईडीने जाधव यांनी परदेशात केलेल्या गुंतवणुकीच्या प्रकरणात ईडी कडून फेमा कायद्या अंतर्गत समन्स पाठवले असून त्यांची चौकशी होणार आहे. यशवंत जाधव यांच्या मालमत्तेची आणखी एक माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यशवंत जाधव यांची संपत्ती 36 वरून 53 वर पोहोचली आहे. त्यात कैसर बिल्डिंगचाही समावेश आहे. या इमारतीतून 80 कोटींचा काळा पैसा बाहेर काढण्यासाठी खरेदी करण्यात आल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांत आयकर विभागाने या ठिकाणी भेट देऊन पडताळणी केली आहे. 

यामध्ये काही लोकांनी प्रतिज्ञापत्रही दिले आहे. काही ज्वेलर्सकडून 6 कोटी रुपयांचे दागिने खरेदी केल्याचे समजले आहे. ईडीने जाधव यांनी परदेशात केलेल्या गुंतवणुकीच्या प्रकरणात ईडी कडून फेमा कायद्याअंतर्गत समन्स पाठवले असून त्यांची चौकशी होणार आहे
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

खाद्यतेल स्वस्त होणार!तेलाच्या आयातीवर 2 वर्षांसाठी कस्टम ड्युटी रद्द