Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अकरावी प्रवेशाचा गोंधळ; विद्यार्थी व पालक संतप्त

Webdunia
गुरूवार, 14 जुलै 2022 (21:48 IST)
दहावीचे निकाल लागल्यानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशाचे दोन भागांचे मॉक अर्ज उपलब्ध करून दिले होते. यातील एक भाग विद्यार्थी लगेचच भरू शकत होते तर दुसरा भाग इतर बोर्डाचा दहावीचा निकाल लागल्यावरच भरता येणार होता. पण आता दुसऱ्या भागाचा नियम केवळ महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना लागू होत असल्याचे समोर आले आहे. कारण इतर ठिकाणी अकरावीची ऑफलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. शिक्षण विभागाच्या या दोन परस्परविरोधी भूमिकांमुळे पुण्यात पालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
 
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल लागून आता बरेच दिवस झालेले असले तरी सीबीएसई आणि आयसीएसईचा निकाल अद्याप लागलेला नाही. सर्व विद्यार्थ्यांना सामान न्याय मिळावा म्हणून बाकी बोर्डांचा दहावीचा निकाल लागल्यावरच प्रवेश प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरु करण्यात येईल असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. पण हा निर्णय महापालिका क्षेत्रापुरताच मर्यादित असल्याचे समोर आल्याने विद्यार्थी, पालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या परिस्थितीमुळे राज्यातील शहरी भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेश लांबली आहे.
 
अकरावी ऑफलाईन प्रवेशासाठीची अर्ज विक्री १३ जुलैपासून सुरू झाली आहे. २१ जुलैला सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार असून २२ जुलै रोजी पहिली गुणवत्ता यादी, २८ ऑगस्ट रोजी दुसरी तर ३ ऑगस्टला तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. या ऑफलाईन प्रवेशप्रक्रियेत सीबीएसई, आयसीएसईसह ज्या केंद्रीय बोर्डांचे दहावीचे निकाल जाहीर झालेले नाही अशा विद्यार्थ्यांसाठी १० टक्के जागा राखीव ठेऊन ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यामुळे ऑफलाईन पद्धतीने प्रवेश घेणाऱ्या महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा पुढील शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. पण मुंबई, पुणे, नागपूरसारख्या प्रमुख शहरात राहणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा मात्र अकरावी प्रवेशासाठी विनाकारण वाट बघण्याची वेळ आली आहे.
 
मुंबई – २ लाख ७७ हजार ८७९पुणे – ९० हजार ८५२नागपूर – ३१ हजार ७१४नाशिक- २५ हजार ०८३अमरावती – १० हजार ५२१

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

नागपुरात टीशर्टच्या पैशांच्या वादातून मित्राचा गळा चिरून निर्घृण खून

ठाण्यात शाळेजवळ झाडाला गळफास लावून विद्यार्थ्यांची आत्महत्या

संजय राऊत काँग्रेसमध्ये जाणार ! दिल्लीत काँग्रेस हायकमांडसोबत सतत बैठका घेत आहेत, या मोठ्या नेत्याच्या दाव्याने उद्धव ठाकरे गटात खळबळ उडाली

ISROच्या 100 व्या मिशनला मोठा झटका

शारीरिक संबंध ठेवताना महिलेने शेजारच्या तरुणाचा गळा चिरला

पुढील लेख
Show comments