Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 31 March 2025
webdunia

अकरावीची सीईटी उच्च न्ययालयाकडून रद्द

Eleventh CET canceled by High Court Maharashtra News Regional News In Marathi Webdunia Marathi
, मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 (15:29 IST)
इयत्ता अकरावीची सीईटी उच्च न्ययालयाकडून रद्द करण्यात आली आहे. इयत्ता दहवीच्या गुणांच्या आधारावर मुलांना अकरावीसाठी प्रवेश द्या,असें उच्च न्यायालयाने सांगितले आहे.दरम्यान,या सीईटीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी राज्य मंडळाने २ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती.तर, प्रवेश ११ वी प्रक्रिया कधी सुरु होणार?, याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. 
 
याचबरोबर, सहा आठवड्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. राज्य मंडळाने दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर केल्यानंतर राज्य शासनाच्या निर्णयानुसार अकरावी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतली जाणार होती.ओएमआर उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार होती व १९ जुलैपासून सर्व मंडळांच्या विद्यार्थ्यांना त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करता येणार होती.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ऑलम्पिक गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्राच्या सन्मानार्थ दर वर्षी 7 ऑगस्ट रोजी भाला फेकण्याचा दिवस साजरा केला जाईल,एएफआयने जाहीर केले