Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुणतांब्यातून शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार; विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं 5 दिवस आंदोलन

Webdunia
बुधवार, 1 जून 2022 (14:56 IST)
पाच वर्षांपूर्वी शेतकऱ्यांचा संप पुकारून राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना ऐरणीवर आणणाऱ्या अहमदनगर  जिल्ह्यातील पुणतांबा गावातून  पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन  सुरू झालं आहे. पुणतांब्यात आजपासून पाच दिवसांचे धरणे आंदोलन सुरू होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर शेतकऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
 
आजपासून ५ जूनपर्यंत पुणतांब्यातील शेतकरी गावात धरणे आंदोलन करणार आहेत. यामध्ये आंदोलनात राज्यभरातले शेतकरी सहभागी होणार आहेत. ५ जूनपर्यंत सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांची दखल न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन करु, असा इशारा पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे.
 
कृषी दिंडीने आंदोलनाला प्रारंभ
 
बळीराजाच्या पुतळ्याला दुग्धभिषेक करून गावातून कृषी दिंडीने पुणतांबा धरणे आंदोलनाला सुरुवात होणार असल्याची माहिती सरपंच धनंजय धनवटे यांनी दिली. पुणतांबा ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलनासाठी मंच उभारला आहे. हे आंदोलन 1 ते 5 जून पर्यंत सुरू असणार आहे. राज्यातील अनेक शेतकरी नेत्यांशी आंदोलनाबाबत चर्चा झाली असल्याची माहिती सरपंच धनंजय धनवटे यांनी दिली.
 
या मागण्यांसाठी आंदोलन:
 
1) ऊसाला एकरी एक हजार रूपये अनुदान द्यावे
 
2) शिल्लक ऊसाला हेक्टरी दोन लाख रूपये द्यावे
 
3) कांद्यासह सर्व पिकांना हमीभाव द्यावा
 
4) कांद्याला प्रती क्विंटल 500 रूपये अनुदान द्यावे
 
5) शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण आणि सुरळीतपणे वीज मिळावी
 
6) थकित विजबिल माफ झाले पाहिजे
 
7) कांदा आणि गव्हाची निर्यात बंदी उठवावी
 
8)सर्व पिकांना आधारभूत किंमत दिली जावी त्यासाठी आयोगाची स्थापना करून निर्णय घ्यावा
 
9) 2017 साली केलेल्या कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी
 
10) नियमित कर्ज भरणारांचे अनुदान दिले जावे
 
11) दुधाला ऊसाप्रमाणे एआरपी लागू केला जावा
 
12) दुधाला कमीतकमी चाळीस रूपये दर दिला जावा
 
13) खाजगी दूध संकलन केंद्रात होणारी लूट थांबवावी
 
14) वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाल्यास भरपाई दिली जावी
 
15) शेतकरी आंदोलनात दाखल गुन्हे मागे घेतले जावे
 
16) वन हक्क कायद्यानुसार आदिवासींच्या जमिनी त्यांच्या नावावर केल्या जाव्या

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

भिवंडीतील भंगार गोदामाला भीषण आग,कोणतीही जीवितहानी नाही

LIVE:निवडणूक निकालानंतर व्हीबीए कोणाला पाठिंबा देईल, प्रकाश आंबेडकर यांचा खुलासा

निवडणूक निकालानंतर व्हीबीए कोणाला पाठिंबा देईल, प्रकाश आंबेडकर यांचा खुलासा

Baba Siddique Murder: बाबा सिद्दीक हत्याकांड प्रकरणात अकोल्यातून 26 वी अटक

आईने आपल्या दोन निष्पाप मुलांची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या केली

पुढील लेख
Show comments