Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शाळेच्या पहिल्या दिवशी साजरा होणार प्रवेशोत्सव

varsha gaikwad
, रविवार, 12 जून 2022 (17:50 IST)
School Entrance Ceremony : यंदा दोन वर्षानंतर शाळा पुन्हा सुरु होणार. कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीला पाहता राज्यात कोरोनाचे निर्बंध लावण्यात आले होते. मुलांचे ऑनलाईन शिक्षण सुरु होते. आता कोरोनाची लाट ओसरली आहे या मुळे या वर्षी पासून राज्यात 15 जून पासून शाळा सुरु होणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये शाळेची ओढ निर्माण होण्यासाठी  राज्यात 15 जून रोजी तर विदर्भात 27 जून रोजी शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.  
 
इयत्ता पहिली ते बारावीतील सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करताना शाळा प्रवेशाच्या पहिल्या दिवशी प्रत्येक अधिकाऱ्याने एका शाळेत जाऊन शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे मनोबल उंच करण्यासाठी प्रबोधन करत शालेय उपयोगी साहित्य किंवा फुल घेऊन जावे आणि विद्यार्थ्यांचे स्वागत करावे. जेणे करून त्यांच्या मनात शाळेविषयी आदर आणि ओढ निर्माण होईल. 
 
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळेत प्रवेशोत्सव साजरे करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार, शिक्षण आयुक्तांनी या संबंधी परिपत्रक काढून शिक्षण संचालक, जिल्हा शिक्षण, आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य , शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षकांना सूचना दिल्या आहेत. 
 
 विद्यार्थ्यांमध्ये शाळेत उपस्थित राहण्याची आवड निर्माण होण्यासाठी शाळेतील वातावरण चैतन्यमय आणि उत्साहवर्धक राहील असे व्यवस्थापन करावे, असे परिपत्रक सर्व संबंधितांना देण्यात आले आहे.विद्यार्थ्यांना त्यांच्या किमान पातळीपर्यंत आणण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, पालक, शिक्षक यांच्याशी चर्चा करून अध्ययन निष्पत्तीसाठी उपाययोजना, सेतू अभ्यासक्रम, इतर शैक्षणिक साधनांची प्रभावी अंमबजावणी करण्याबाबत सहकार्य करावे. तसेच शाळा प्रवेशाच्या दिवशी माजी विद्यार्थी, माजी शिक्षक, स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ यांचे सहकार्य घेण्यात यावे, असेही याद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाजीपाल्याचे दर कडाडले,जाणून घ्या आजचे भाव