Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सर्पदंश झाला तरी ती उपचारासाठी स्वत स्कुटी चालवत गेली मात्र दुर्दैव त्या तरुणीचा मृत्यू

Webdunia
सोमवार, 20 फेब्रुवारी 2023 (20:50 IST)
. येवला तालुक्यातील  राजापूर येथील पन्हाळपाटी शिवारात राहणाऱ्या एका तरुणीचा  सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू  झाल्याची घटना घडली आहे..
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रगती  वाघ असे मृत तरुणीची नाव असून ती राजापूर येथील एका महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती. तिच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याने आई-वडिलांना शेतीच्या कामात देखील मदत करत होती.
काल दुपारच्या सुमारास प्रगती शेतात काम करत असतांना तिला सर्पदंश  झाला. त्यानंतर अशा परिस्थितीत देखील ती स्वतः स्कुटी चालवत राजापूर येथे आली. मात्र त्याठिकाणी पोहचली असता ती बेशुद्ध झाली. यानंतर नातेवाईकांनी तिला पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात  दाखल केले.
 
सर्पदंशामुळे तरुणीचा मृत्यू
पंरतु, त्याठिकाणी तिला बरे वाटत नसल्याने पुढील उपचारासाठी साई सिद्धी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरु असतानाच तिची प्राणज्योत मावळली. दरम्यान प्रगतीच्या अकाली जाण्याने तिच्या कुटुंबीयांसह राजापूर गावावर  शोककळा पसरली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबाबत आज होणार 'मोठा निर्णय'? एकनाथ शिंदे यांच्या अचानक सातारा दौऱ्याचे कारण आले समोर

Cyclone Fengal चा परिणाम महाराष्ट्रावरही दिसणार, या ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्रात मुख्यमंत्री फडणवीस नाही तर कोण? जाणून घ्या विलंबाचे खरे कारण

LIVE: विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

पुढील लेख
Show comments