Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अहमदनगर जिल्ह्यात खळबळ : पुजारी कुटुंब कोरोनाबाधित

Webdunia
गुरूवार, 7 ऑक्टोबर 2021 (22:33 IST)
अहमदनगर- नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर तुळजाभवानी माता मंदिरातील पुजारी कुटुंब कोरोनाबाधित आहे. ते मंदिरामध्ये राजरोसपणे फिरत असल्याचा आरोप बुऱ्हाणनगर ग्रामस्थांनी केला आहे.शारदीय नवरात्र उत्सव सुरु झाला आहे. यातच नगरमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बुऱ्हानगर देवीचे पुजारी भगत कुटुंबीय कोरोना बाधित असून ते मंदिरामध्ये राजरोसपणे फिरून कोरोनाचा प्रादुर्भाव फैलावत आहेत असा आरोप बुऱ्हानगर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला आहे. दरम्यान यामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, कुटुंबियांमधील काहींना काेराेनाचे निदान झाले आहे. भाविकांना आमच्यामुळे काेणत्याही प्रकारचा संसर्ग हाेणार नाही, याची खबरदारी घेत आहाेत, अशी माहिती देवीचे पुजारी वकील अभिषेक भगत यांनी दिली.
 
बुऱ्हानगर येथील श्री.जगदंबा तुळजाभवानी मंदिर हे तुळजापूर देवीचे स्थान आहे हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून राज्यभर याची ओळख आहे,त्यामुळे शारदीय नवरात्र उत्सवामध्ये भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करत असतात.यातच हि धक्कादायक माहिती समोर आली असल्याने भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. याप्रकरणी बुऱ्हाणनगर गावचे सरपंच रावसाहेब कर्डिले, अक्षय कर्डिले, उपसरपंच जालिंदर जाधव यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला याबाबत निवेदन दिले आहे.
 
पुजारी कुटुंब विलगीकरण कक्षामध्ये न जाता मंदिरामध्ये फिरत आहे. मंदिरात राज्यभरातून भाविक येतात. त्यामुळे काेराेना संसर्गाचा धाेका संभावताे.

कोरोना रुग्ण संख्या वाढल्यास याची जबाबदार जिल्हा प्रशासनाची असेल, असे निवेदनात म्हटले आहे. वकील भगत म्हणाले, ”कुटुंबातील चाैघांना काेराेना संसर्गाचे निदान झाले आहे. वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
 
मी, पत्नी आणि दाेन वर्षाचा मुलगा याला काेराेना संसर्ग झाला असून, आम्ही विलगीकरण कक्षात आहाेत. भाविकांना आमच्यापासून संसर्ग हाेणार नाही, याची पूर्ण खबरदारी घेत आहाेत. आमच्याबाबत चुकीची माहिती पसरवली जात आहे.”

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

नवी मुंबईत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी जोडप्याला त्यांच्या मुलासह अटक

LIVE: मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले आहे

डंपरची दुचाकी आणि पिकअपला धडक, ५ जणांचा मृत्यू, १२ जखमी

मनू भाकरला बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कार मिळाला

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैद्यकीय मदत कक्ष तयार केला

पुढील लेख