Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाळांना दिलं मुदत संपलेलं औषध

बाळांना दिलं मुदत संपलेलं औषध
, शनिवार, 4 डिसेंबर 2021 (16:14 IST)
सांगली महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दीड महिन्याच्या बाळांना रक्तवाढीसाठी दिलेल्या औषधाची मुदत संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार करताच आरोग्य विभागाने या औषधांच्या बाटल्या परत घेतल्या. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
 
नेमक काय घडलं?
संजयनगर परिसरातील अंगणवाडीतून लहान मुलांसाठी रक्तवाढीचे औषध दिले जातात. लहान मुलांना औषध देण्यासाठी पालकांना या औषधाच्या बाटल्या दिल्या जातात. हे औषध दिल्यानंतर काही मुलांना उलट्या होऊ लागल्या. पालकांनी तक्रार केल्यावर औषध बाटलीची मुदत नोव्हेंबरपर्यंत असल्याचे समोर आले. या गंभीर प्रकाराबद्दल आरोग्य विभागाकडे तक्रार केली गेली आाहे.
 
सामाजिक कार्यकर्त्यांनी चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान नोव्हेंबरची मुदत असलेल्या तीन बाटल्यांचे वाटप करण्यात आल्याचे विभागाकडून कबुल करण्यात आले असून तीन बाटल्या परत देखील घेतल्या गेल्या आहे. ज्या सीलबंद असून मुलांना औषध देण्यात आलेले नाही. तसेच आरोग्य सेवकांनी तब्येत बिघडलेल्या मुलांची प्रकृतीची चौकशी केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देशात ओमिक्रॉन व्हेरियंटचा आणखी एक रुग्ण आढळला, संक्रमित व्यक्ती झिम्बाब्वेहून गुजरातमधील जामनगरला आली