Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

साहित्य संमेलन : यथोचित सन्मान होणार नसेल..तर तिथे जाऊन काय करायचे?

साहित्य संमेलन : यथोचित सन्मान होणार नसेल..तर तिथे जाऊन काय करायचे?
, शनिवार, 4 डिसेंबर 2021 (15:16 IST)
देवेंद्र फडणवीसांचे ट्विट
अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला सुद्धा शुभेच्छा आहेतच. पण जेथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मान होणार नसेल, तर तेथे जाऊन तरी काय करायचे? अशी खरमरीत टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
दरम्यान देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर येणार होते. आणि संमेलनाला येणार का नाही याबाबत अनिश्चितता होती. मात्र आता त्यांनी ट्विटच्या माध्यमातून आपला रोष व्यक्त केला आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले कि, मराठी सारस्वतांचा पूर्णत: सन्मान आणि आदर आहे. त्यांना मी अभिवादन करतो. तसेच अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला सुद्धा शुभेच्छा आहेतच. मात्र जिथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मान होणार नसेल, तर तिथे जाऊन तरी काय करायचे? असा सवाल त्यांनी आयोजकांना केला आहे.
तर सावरकरांच्या नावावरून देखील त्यांनी आयोजकांची कानउघाडणीव केली आहे. ते म्हणाले कि ‘या नगरीला कुसुमाग्रजांचे नाव दिले, याचे स्वागतच पण केवळ स्वातंत्र्यवीरांचे नाव न देण्याच्या अट्टाहासातून त्यांचे नाव देण्यातून या दोन्ही महनियांची उंची आपण कमी करीत नाही का? असो, आमचे आदर्श, प्रेरणास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व अजरामर आणि प्रत्येकाच्या मनात आहे.
काय आहे नाराजी प्रकरण?
साहित्य संमेलनाच्या पत्रिकेत देवेंद्र फडणवीसांचे नाव नव्हते. यावरून नाशिक भाजप तसेच महापौर सतीश कुलकर्णी देखील नाराज होते. यावर स्वागताध्यक्ष भुजबळ यांनी फगडणवीसांना फोन करून संमेलनाला उपस्थित राहण्याचा आग्रह केला. यावर फडणवीस हे साहित्य संमेलनास उपस्थित राहणार असल्याचे देखील स्पष्ट झाले होते. मात्र आज अचानक त्यांनी ट्विट करत मोठा बॉम्ब फोडला आहे.त्यामुळे आता संमेलन आयोजक काय भूमिका घेतात याकडे नाशिकसह भाजप चे लक्ष लागून आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्वतःला व्यक्त करण्याची संधी कधीच सोडू नका –ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर