rashifal-2026

मंत्री उदय सामंत, यशवंत जाधवांची शिवसेनेतून हकालपट्टी

Webdunia
बुधवार, 24 ऑगस्ट 2022 (08:01 IST)
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. एकामागोमाग एक असे ४० आमदार शिंदेंबरोबर गेले. त्यामुळं ठाकरे सरकार कोसळलं आणि शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. यांनतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांनी शिंदे गटात गेलेल्या आमदारांवर पक्ष विरोधी कारवाईचा ठपका ठेवत आमदारांची पक्षातून हकालपट्टी करण्यास सुरूवाल केली. आता सर्वात शेवटी शिंदे गटात सामील झालेले मंत्री उदय सामंत आणि यशवंत जाधव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
 
दरम्यान, शिवसेनेकडून सातत्याने बंडखोरी करणाऱ्या नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. यात आता शिंदे गटात सामील झालेले मंत्री उदय सामंत आणि यशवंत जाधव यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवायाचा ठपका ठेवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उदय सामंत आणि यशवंत जाधव यांची पक्षातून हकालपट्टी केलीय. तसेच उदय सामंत आणि यशवंत जाधव यांची शिवसेनेच्या उपनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

सिडनी गोळीबार घटनेतील मृतांची संख्या 16 वर पोहोचली

LIVE: २९ महानगरपालिकांच्या निवडणुका आज जाहीर होण्याची शक्यता

पुण्यातील कोचिंग क्लासमध्ये चाकू हल्ल्यात विद्यार्थ्याचा मृत्यू

19 वर्षांखालील आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानचा 90 धावांनी पराभव केला

महापालिकांचं बिगुल आज वाजणार

पुढील लेख
Show comments