Festival Posters

विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी

Webdunia
शनिवार, 16 जुलै 2022 (21:40 IST)
शिवसेना आणि बंडखोर शिंदे गट यांच्यातील संघर्ष दिवसागणिक वाढताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 40 पेक्षा अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर अनेक सेना पदाधिकारी शिंदे गटात दाखल होत आहेत. तर, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी  पुणे जिल्ह्यातील शिवसेना नेते व माजी मंत्री विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी तसे आदेश जारी केले आहे. विजय शिवतारे हे शिवसेनेचे माजी आमदार असून ते पुरंदर तालुक्यातून शिवसेनेचं प्रतिनिधीत्व करत होते. 
 
पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित, वसई तालुका प्रमुख निलेश तेंडुलकर, उपजिल्हाप्रमुख नवीन दुबे, वसई तालुका उपप्रमुख तथा माजी नगरसेविका यांचे पती दिवाकर सिंग, काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत दाखल झालेले वसई विरार चे माजी स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी यांच्यासह 50 शिवसेना पदाधिकारी एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. काल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन समर्थन दाखविले आहे.
 
औरंगाबादचे युवासेना उपसचिव राजेंद्र जंजाळ यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. राजेंद्र जंजाळ यांनी पक्षाच्या विरुद्ध काम केल्याने त्यांची शिवसेनेतून हकालपट्टीची घोषणा शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी युवा सेनेच्या निष्ठा मेळाव्यात केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

२१ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरु, श्री गुरुदेव दत्तांची भक्ती आणि महालक्ष्मीची कृपादृष्टीचा काळ

Wedding Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी

एनआयटी नागपूरने रिक्त जागा जाहीर केल्या ,शिक्षकेतर पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

फक्त 10 मिनिटांत बनवा हे घरगुती केसांचे तेल, केस गळणे थांबेल

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 5 गोष्टी खा

सर्व पहा

नवीन

आयसीसी टी-20 विश्वचषक 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार, भारत-पाकिस्तान एकाच गटात

रोहित शर्माची स्पर्धेचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती, ICC अध्यक्ष जय शाह यांनी केली मोठी घोषणा

तोपर्यंत 'लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

LIVE: पालघरात क्लोरीन गॅसची गळती, एकाचा मृत्यू

संविधान दिनानिमित्त राष्ट्रपती मुर्मू यांचे संबोधन

पुढील लेख
Show comments