Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

40 आमदार फोडून भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती हे सत्य कसं बदलणार, फडणवीस यांचा सवाल

devendra fadnavis
, सोमवार, 26 जून 2023 (21:02 IST)
सन 1977-78 मध्ये शरद पवार यांनी 40 आमदार फोडून भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती हे सत्य कसं बदलणार, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. त्यावेळी शरद पवाहे हे वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. तेव्हा त्यांनी  40आमदार फोडले आणि भाजतसोबत सत्ता स्थापन केली. तेव्हा शरद पवारांनी केले ती मुत्सद्देगिरी, मग आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे केलं त्याला बेईमानी कसं म्हणता येईल, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.
 
फडणवीस म्हणाले, मी त्यावेळेस प्राथमिक शाेळत होतो. पण मी काल जे काही बोललो ते शरद पवार यांनी ऐकलं नाही किंवा मी उपस्थित केलेल्या मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न शरद पवार करत आहेत. सन 1977-78 साली वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात शरद पवार हे मंत्री होते. तेव्हा त्यांनी 40 आमदार फोडले आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यांनी केली ते मुत्सद्देगिरी, मग मुख्यमंत्री शिंदे यांनी जे केलं त्याला बेईमानी कसं म्हणता येईल. कारण शिंदे यांची केस तर मेरीटवर आहे. ते आमच्यासोबतच निवडणूक जिंकले होते. त्यांनी 50 आमदारांना घेऊन आमच्या सोबत सत्ता स्थापन केली. ही कृती बेईमानी कशी म्हणता येईल. मी शाळेत होतो की आणखी कुठे होतो. पण सत्य हे बदलता येणार नाही, असे  स्पष्ट केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

माझा मी मध्ये छोटासा मार्ग काढत आहे : महादेव जानकर