Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांचे लाडकी बहीण योजनेबाबत मोठे वक्तव्य

Webdunia
सोमवार, 13 जानेवारी 2025 (08:58 IST)
Ladki Bahin Yojana News: महाराष्ट्र विधानसभेतील मोठ्या विजयानंतर, शिर्डी येथे भारतीय जनता पक्षाचे दोन दिवसांचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात केंद्रीय मंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व भाजप नेते उपस्थित होते.
ALSO READ: नाशिकमध्ये भीषण अपघात, टेम्पो आणि ट्रकच्या धडकेत 8 जणांचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी  'लाडकी बहीण योजना' बंद करणार असल्याच्या अफवांना फेटाळून लावले आणि सांगितले की यासह प्रत्येक योजना महिला, दलित आणि उपेक्षितांच्या हितासाठी राबविण्यात आली आहे आणि ती पुढेही सुरू राहील असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणालेत. महाराष्ट्रातील शिर्डी येथे आयोजित भारतीय जनता पक्षाच्या दोन दिवसांच्या राज्य परिषदेला फडणवीस संबोधित करत होते. फडणवीस म्हणाले, “अशा अफवा पसरत आहे की आम्ही लाडकी बहीण योजना आणि इतर कल्याणकारी योजना बंद करू. मी हे स्पष्ट करू इच्छितो की महिला, दलित आणि उपेक्षित लोकांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजना सुरूच राहतील. सध्याच्या योजनांव्यतिरिक्त, आम्ही आमच्या जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासने देखील पूर्ण करू.”<>

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

LIVE: नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांचे लाडकी बहीण योजनेबाबत मोठे वक्तव्य

नाशिकमध्ये भीषण अपघात, टेम्पो आणि ट्रकच्या धडकेत 8 जणांचा मृत्यू

देवजीत सैकिया भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे नवे सचिव बनले

एमव्हीएमध्ये फूट पडणार नाही, अंबादास दानवे म्हणाले

पुढील लेख
Show comments