Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फडणवीसांचे अजित पवारांना चिमटे,संधी असतानाही मुख्यमंत्री केलं नाही…

devendra fadnavis
, शनिवार, 31 डिसेंबर 2022 (09:19 IST)
संधी असतानाही शरद पवारांनी तुम्हाला मुख्यमंत्री केलं नाही, 2004 साली जास्त आमदार असून दादांना मुख्यमंत्री केलं नाही, याचं दु:ख वाटतयं. दादा तुम्ही काल म्हणाला होता की अमृतांशी बोला पण दादा तुम्ही सुनेत्रा वहिनींना विचारलं होतं का? असा मिश्किल प्रश्नही फडणवीस यांनी केला आहे.विधानसभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा चिमटा काढला .अजित पवार यांनी काल बोलताना या सरकारमध्ये एकही महिला नेत्याचा समावेश नाही म्हणत अमृता वाहिणींना सांगतो असं अजित पवार म्हणाले होते.याला उत्तर आज फडणवीसांनी दिले.
 
पुढे फडणवीस म्हणाले की, ‘ दादांनी अनेक विषयावर चर्चा केली होती. एका गोष्टीचं दुख: आहे की संधी मिळाली असताना पवार साहेबांनी तुम्हाला मुख्यमंत्री नाही केलं. 2004 ला संधी होती. तुमचे जास्त नेते निवडून आले होते. तुमच्या कराराप्रमाणे ज्याचे जास्त नेते त्याचा मुख्यमंत्री होता.तरीही तुम्हाला मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली नाही असा टोला अजित पवार यांना फडणवीस यांनी लगावला आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

१६६ आरोपींवर ठाणे पोलिसांची एका रात्रीत कारवाई