Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विदर्भात पकडल्या लाखो रुपयांच्या बनावट नोटा

Webdunia
दारव्हा या भागांमध्ये काही दिवसांपासून भारतीय चलनातील बनावट नोटा चलनात आणत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रज्ञेश पाटील याला एका पांढर्‍या रंगाच्या इंडिका सह ताब्यात घेण्यात आले. त्याच्याजवळून 6 लाख 77 हजार पाचशे रुपयांच्या बनावट भारतीय चलनी नोटा जप्त करण्यात आल्या. तसेच इतर 1 लाख 64 हजार  920 रुपयांचे  बनावट नोटा तयार करण्याचे साहित्य असा एकूण 8 लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात बनावट नोटा चलनात येत असल्याचा गोरख धंदा उघडकीस आला.
 
स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार प्रज्ञेश पाटील राहणार ब्रह्मी (ता.दारव्हा) हा आपल्या (एमएच 29 आर 6912) या वाहनाने बनावट नोटा यवतमाळ येथील बाजारात चलनात आणण्यासाठी निघाला होता. यावेळी सापळा रचून प्रज्ञेश पाटील याच्या वाहनाची तपासणी केली असता त्याच्याजवळ दोनशे रुपयांच्या 14 बनावट नोटा व 2 हजार रुपयांच्या 6 बनावट नोटा असा एकूण 14 हजार 800 रुपयांच्या नोटा आढळून आल्या. त्याला ताब्यात घेऊन त्याची सखोल तपासणी केली असता तो आपला मित्र किशोर आसळकर (रा. कुंभारकिनि ता.दारव्हा) याच्या सोबत मिळून बनावट नोटा बनविल्याचे सांगितले. पोलिसांनी ब्रह्मी येथील घराची झडती घेतली असता एक कॅनोन कंपनीचे प्रिंटर, बॉंड पेपर, इंक बॉटल, पेपर कटर असे साहित्य आढळून आले.
 
तसेच 3 पांढऱ्या कागदावर 2 हजार रुपयांच्या 2 नोटा, 6 पांढर्‍या कागदावरती 200 रुपयांच्या 4 नोटा स्कॅन करून प्रिंट काढलेल्या, तसेच दोनशे रुपयांच्या 1895 बनावट चलनी नोटा 2 हजार रुपयांच्या 142 चलनी नोटा असा एकूण 7 लाख 77 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याचप्रमाणे बनावट नोटा बनवण्याचे साहित्य व (एम एच 29 आर6912) इंडिका विस्टा वाहन जप्त करण्यात आले. आरोपी प्रथमेश पाटील याचा साथीदार किशोर आसळकर हा अद्याप फरार असून या दोघांविरुद्ध लाडखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपी प्रज्ञेश पाटील याच्यावर वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे व मूर्तिजापूर येथे बनावट नोटा संदर्भात व घरफोडी प्रकरणात गुन्हा नोंद असल्याचे चौकशीत उघड झाले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक  एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, बंडू डांगे, गजानन धात्रक, विशाल भगत, किरण पडघन, निलेश भुसे, मोहम्मद जुने यांनी ही कारवाई केली. 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments