rashifal-2026

शेतकऱ्याची शक्कल : दुचालीका केला नांगर

Webdunia
मंगळवार, 24 जुलै 2018 (09:08 IST)
यवतमाळ येथील बोरी अरब गावाच्या एका शेतकऱ्याने शेतात डवरर्णी साठी बैलजोडी मिळत नसल्याने युक्ति वापरून दुचाकीच्या साह्याने डवरणी पूर्ण केली आहे त्याची आणि सर्वत्र चर्चा आहे.
 
शेतकरी सुभाष बांडे यांचे बोरी शिवारात ४ एकर शेती आहे शेतात सोयाबीन लागवड केली अशावेळी शेतात डवरणी करून शेतातील तण काढायचे होते अशावेळी डवरणी साठी बैलजोडी होती मात्र आजूबाजूला शेतीचे काम सुरू असल्याने बैलजोडी मिळत नव्हती ही बाब त्याने त्याचे मामा ला सांगितली शेतकऱ्याने त्याचे मामा किरण कावरे यांनी दुचाकीला डवरणीचे साहित्य बांधून डवरणी करून पाहण्याचा सल्ला दिला आणि त्या शेतकऱ्याचा प्रयत्न यशस्वी झाला.एक एकरात दोन लिटर पेट्रोल अशापद्धतीने त्या शेतकऱ्याला ८ लिटर पेट्रोल मध्ये दोन सहकारी मित्र सोबतीने त्यानां २०० याप्रमाणे रोज दिला आणि कमी वेळात डवरणी केली. या डवरणी साठी या शेतकऱ्याने दुचाकीचे समोरील चाकावरील कव्हर काढले जेणे करून त्याला माती लागू नये  तसेच एक मोठी लाकडी काठी दुचाकीच्या समोरील चाकाच्या थोड्या वर बांधली आणि त्याच काडीवर दोन साईड ला दोन डवरे बांधेल आणि ते डवरे सांभाळण्यासाठी दोन मित्र दुचाकीच्या काही फूट अंतरावर मागे ठेवले आणि डवरणी केली आणि आज त्या शेतकऱ्याचे डवरणी यशस्वी झाल्यानंतर त्याचे मामा कावरे यांनी आता त्यांच्या शेतात डवरणी करण्यास सांगितले आहे आज त्याची दुचाकी आणि डवरणी कशापद्धतीने करतो हे पाहण्यासाठी लोक गर्दी करतात. डवरणीसाठी बैलजोडी मिळत नाही या अडचणी वर या शेतकऱ्याने युक्ती करून अडचणींवर मात केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

LIVE: महापालिका निवडणुकीचे निकाल 'फिक्स्ड' संजय राऊतांचा आरोप

जेजुरीत विजयाच्या जल्लोषात स्फोट; नवनिर्वाचित महिला नगरसेवकांसह 16 जण भाजले

महायुतीचा मोठा विजय, संघटना आणि सरकारच्या कठोर परिश्रमाचे फळ आहे, मुख्यमंत्री फडणवीस

बांगलादेशातील चितगावमध्ये भारतीय व्हिसा सेवा अनिश्चित काळासाठी बंद

पुणे जिल्ह्यातील 17 नगरपालिकांवर अजित पवारांच्या गटाचे वर्चस्व

पुढील लेख
Show comments