Festival Posters

बिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून शेतकरी बालंबाल बचावला

Webdunia
बुधवार, 9 मार्च 2022 (15:10 IST)
शेतात पाणी भरत असताना शेतकऱ्यांवर बिबट्यांने हल्ला केल्याची धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे घडली आहे. दैव बलवत्तर म्हणून दोन शेतकरी या बिबट्याच्या हल्ल्यात वाचले. दरम्यान परिसरात सापळा बसविण्यात यावा अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे.
 
याबाबत अधिक माहिती अशी, कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे शेतामध्ये भिकाजी बोडखंळ व दिनकर बोंडखळ शेतीला पाणी भरत होते. व्यंकट बोंडखळ यांना बिबट्या चाल करून जात असताना दिसला त्यांनी मोठ्याने आवाज देत बोंडखळ यांना सावध केले. मोठी डरकाळी फोडत बिबट्या अंगावर झेप घेण्याच्या स्थितीत असतानाच आपल्या जवळच्या बॅटरी चालू करत बिबट्याच्या डोळ्यावर चमकवल्या त्यामुळे बिबट्या तिथेच थबकला.
 
व्यंकट बोंडखळ यांनी सावध पवित्रा घेत सयराम बोंडखळ, भाऊसाहेब बोंडखळ, नितीन रांधवण, भास्कर होन त्यांना आवाज देत बोलावून घेतले. सयराम बोंडखळ यांचा ट्रॅक्टर शेतकऱ्यांनी चालू करत बिबट्याच्या दिशेने फिरवला मग मात्र बिबट्याने तिथून पळ काढला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जाणून बुजून पिंजरा लावला जात नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

LIVE: मोहन भागवत यांनी गंगाधर राव डायग्नोस्टिक सेंटरचे उद्घाटन केले

नाशिक पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला

नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने महाराष्ट्र केसरीचे विजेतेपद पटकावले

अमेरिकी सरकारचा मोठा निर्णय; सोन्याच्या नाण्यांवर ट्रम्प यांचे चित्र छापले जाणार

मध्य पूर्वेतील संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली

पुढील लेख
Show comments