Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाविद्यालयाच्या शुल्कामध्ये सवलत मिळणार

fee discount
Webdunia
मंगळवार, 29 जून 2021 (08:28 IST)
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंसमवेत सोमवारी बैठक घेतली असून यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी विद्यापीठाशी संलग्न अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालयाच्या शुल्का मध्ये सवलत देण्याचे मान्य करण्यात आले आहे. मात्र सवलत किती मिळणार याची माहिती सविस्तर आढावा घेवून मंगळवारी जाहीर करणार असून कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ करण्याबाबतही विचार झाला असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.
 
कोरोनामुळे महाविद्यालये बंद असल्याने ग्रंथालय, प्रयोगशाळा, क्रिडांगण यासह इतर शुल्क कमी करावे अशी मागणी केली जात आहे. कोरोनामुळे शुल्क कमी करावे अशी मागणी गेल्या वर्षापासून विद्यार्थी व पालक सातत्याने करत आहेत. याच पाश्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील शुल्कात २५ टक्के कपात केली आहे.
 
नागपूर विद्यापीठाने ग्रंथालय, प्रयोगशाळा, क्रिडांगण आदी इतर शुल्क कमी केले आहे. याच धर्तीवर सर्वच विद्यापीठांची फी कमी करावी अशी मागणी होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

Nagpur Violence आरोपीचे घर पाडणे चुकीचे होते असे म्हणत नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी मुंबई उच्च न्यायालयात मागितली माफी

इंग्रजी माध्यम शाळांमध्ये मराठीवर बंदी घालण्यात आल्याने मनसे संतप्त, शिक्षण विभागाने कारवाईचा इशारा दिला

मोठी बातमी: गरुड जगन्नाथ मंदिराचा ध्वज घेऊन उडून गेला, दुर्घटनेची भीती

झहीर खान बाबा झाला, पत्नी सागरिकाने दिला मुलाला जन्म

शेख हसीना आणि त्यांच्या मुलाविरुद्ध नवीन अटक वॉरंट जारी

पुढील लेख
Show comments