Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ठाकरे कुठे आहेत हे मला शोधून दाखवा. आज सत्ता तुमची आहे तर उद्या आमची सत्ता असेल.-भाजपा नेते निलेश राणे

Webdunia
गुरूवार, 20 जानेवारी 2022 (08:23 IST)
कोकणातील नगरपंचायत निवडणुकांचा निकाल बुधवारी जाहीर झाला. यामध्ये दापोली, मंडणगड नगरपंचायत, ठाणे जिल्ह्यातील शहापूर नगरपंचायत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, देवगड-जामसांडे, वाभवे-वैभववाडी व कसई-दोडामार्ग नगरपंचायत आणि रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींचा समावेश होता. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या सिंधुदुर्गात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. देवगड जामसंडे नगरपंचायतीमध्ये शिवसेनेने यंदा आठ जागांवर विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर विजय मिळवला आहे. त्यावर भाजपा नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
सिंधुदुर्गात नगरपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर संध्याकाळी भाजपा नेते निलेश राणे यांनी कुडाळ येथे कार्यकर्त्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कुडाळ नगरपंचायतमध्ये सत्ता कोणाची येईल, याबाबत आपण आता बोलू शकत नाही, असं स्पष्ट केले. तसेच कुडाळ नागरपंचायतीत शिवसेनेने प्रचारात पालकमंत्री आणि खासदार यांना आणलं. पण तरीही शिवसेनेचा पराभव झाला. या पराभवाला खासदार विनायक राऊत जबाबदार असल्याची टीका निलेश राणे यांनी यावेळी केली.
 
“उपमुख्यमंत्री अजित पवार, सतेज पाटील येऊन गेले. पालकमंत्री, खासदार आमदार यांच्याविरोधात आपण लढलो. हा पराभव आमचा नसून सत्ताधाऱ्यांचा आहे. एवढं सगळं साम्राज्य असूनसुद्धा सत्ता स्थापन करता आली नाही. हे प्रत्येक निवडणुकीत स्पष्ट होत आहे,” असे निलेश राणे म्हणाले.
 
“धनजंय मुंडेंचे कुठे काय काय ठेवले आहे हे त्यांनाच माहिती नाही. संपूर्ण राज्यात भाजपाचे सर्वात जास्त सदस्य निवडून आले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी आणि तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना आहे.  असे निलेश राणे यांनी म्हटले.
 
“ठाकरे कुठे आहेत हे मला शोधून दाखवा. आज सत्ता तुमची आहे तर उद्या आमची सत्ता असेल. आम्ही तर दया मायाही करत नाही. म्हणून आम्ही उद्या सत्तेवर बसल्यावर काय होईल याचा विचार सत्ताधाऱ्यांनी करावा,” असा इशारा निलेश राणे यांनी दिला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात युद्धविराम

LIVE: एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर नाकारली

महाराष्ट्रात भाजप अडचणीत, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर नाकारली

चंद्रशेखर बावनकुळे विरोधकांना प्रतिउत्तर देत म्हणाले- लोकसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये कोणतीही गडबड न्हवती का?

या देशात फ्रॉड आहे EVM मशीन, महाराष्ट्र निवडणूक निकालावर म्हणाले संजय राऊत

पुढील लेख
Show comments