Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आम्ही नेतेमंडळी तर भेटत असतो, पण तुम्हालाही गावपातळीवर तिन्ही पक्षाला एकत्र भेटावं लागेल

Webdunia
गुरूवार, 16 मार्च 2023 (08:26 IST)
चव्हाण सेंटरमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीतून महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी उपस्थितीत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. दरम्यान त्यांनी शिंदे गटासह भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.
 
उद्धव ठाकरे भाषण करत असताना सभागृहात एक आगळीवेगळी घटना घडली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर “देश का PM कैसा हो, शरद पवार जैसा हो” अशी घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीनंतर उद्धव ठाकरेंनी मिश्किल टिप्पणी केली. शरद पवारांना पंतप्रधान बनवण्यास काहीही हरकत नाही. पण आधी सगळ्यांनी एकत्र येऊन लढा. आधी गावपातळीवर एकत्र येऊन दाखवा, असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं.
 
महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही नेतेमंडळी तर भेटत असतो. पण तुम्हालाही गावपातळीवर तिन्ही पक्षाला एकत्र भेटावं लागेल. आपण जर लढणार असू आणि लोकसभा व विधानसभा डोळ्यासमोर असेल तर पहिली शपथ घ्या… येथे आपल्या पक्षाच्या पदरात काही पडलं नाही तरी चालेल. पण ग्रामपंचायत असो वा एखाद्या सोसायटीची निवडणूक असो भाजपा आणि मिंधे गटाबरोबर युती करायची नाही. ही पहिली तयारी करा.

संबंधित माहिती

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

RR vs PBKS : पंजाब किंग्जने राजस्थानचा पाच गडी राखून पराभव केला

नीरज चोप्राने 82.27 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नात सुवर्णपदक जिंकले

Gold-Silver Price : सोने-चांदी पुन्हा महागले, जाणून घ्या किती वाढले

चारधाम यात्रा मार्गावर रस्ता अपघात,भाविकांची कार उलटून 8 जण जखमी

Chess: अर्जुन एरिगेसीला शारजाह मास्टर्समध्ये प्राधान्य

पुढील लेख
Show comments