Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पिंपळगावचे पाचशे पुरातन वृक्ष दिसणार गुगल मॅपवर

Webdunia
गुरूवार, 14 एप्रिल 2022 (22:01 IST)
नाशिक : माझी वसुंधरा अभियान अंतर्गत “हेरीटेज ट्री” (पुरातन वृक्ष) गणना पूर्ण करून ती गुगल मॅप्स वर प्रकाशित करणारी पिंपळगाव बसवंत ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
 
नाशिकच्या निफाड तालुक्यातील ४१,५५९ लोकसंख्या असलेली पिंपळगाव बसवंत ही ग्रामपंचायत असून त्यांनी “हेरीटेज ट्री” (पुरातन वृक्ष) गणना पूर्ण केली आहे. गावाच्या एकुण क्षेत्रफळात १६,५०० वृक्षांचा समावेश असून त्यापैकी ४८० वृक्ष हे पुरातन “हेरीटेज ट्री” (पुरातन वृक्ष) आढळून आले आहेत.
तसेच ही वृक्ष गणना पूर्ण करून गुगल मॅप्स वर प्रकाशित करण्यात आली आहे. सदर गणना गुगल मॅप्स वर प्रकाशित करणारी पिंपळगाव बसवंत ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून माझी वसुंधरा अभियान सुरु आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्वच नगरपालिका, नगरपरिषद यांनी सहभाग नोंदविला होता. या मोहिमेच्या अंर्तगत शहरातील किंवा नगरपालिका हद्दीतील पुरातन वृक्षांचे संवर्धन करणे होय.

संबंधित माहिती

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

राज्यात पुन्हा येणार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना दिला पावसाचा अलर्ट

पुढील लेख
Show comments