Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पश्चिम महाराष्ट्र, कोकणात पूरस्थिती गंभीर

Webdunia
बुधवार, 26 जुलै 2023 (08:22 IST)
राज्यात अनेक भागांत संततधार सुरू आहे. मात्र, मराठवाड्यासह अनेक भागांत अजून पावसाचा जोर वाढलेला नाही. मात्र, दुसरीकडे विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती कायम असून, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने शेतपिकांची मोठी हानी झाली आहे. तसेच नदी काठावरील नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे.
 
कोकणात पावसाची संततधार सुरू असून पुन्हा एकदा खेड, चिपळूण, महाड ही तीन शहरे पुराच्या उंबरठ्यावर आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. खेड नगर परिषद प्रशासन, चिपळूण नगर परिषद प्रशासन आणि महाड प्रशासन अलर्ट मोडवर आहे. खेडच्या जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोकणातील अनेक रस्ते हे पाण्याखाली गेले आहेत. सावंतवाडीत रस्ते पाण्याखाली, राजापुरात पुराचे पाणी घुसले आहे.
 
कोकणात मुसळधार पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात हवामान विभागाकडून पुढील दोन दिवसासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, मंगळवारी काही अंशी पावसाचा जोर ओसरला. परंतु पुराचा धोका वाढलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही नद्या ओसंडून वाहात आहेत. पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली असून, अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी तुंबले आहे, तर काही ठिकाणी पुलावरून पाणी जात असल्याने रस्ते जलमय झाले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक खोळंबली आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

पहिले आरएसएस ची गरज होती, आता भाजप स्वतः सक्षम- जेपी नड्डा यांचा जबाब

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू?

एकाच तरुणाने केले 8 वेळा मतदान!एफआयआर नोंदवला

मतदानापूर्वी आमच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना नोटीस देऊन उठवत आहे पोलीस- शिवसेना(युबीटी)चा आरोप

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर लोणावळ्याजवळ कंटेनर अपघातानंतर आग;एकाचा मृत्यू

Lok Sabha Election 2024 : मुंबईतील 6 जागांवर आज मतदान, 35000 पोलीस तैनात, केंद्रीय दलेही सज्ज

Lok Sabha Election 2024 : मुंबईत पाचव्या टप्प्यातील मतदान आज, लोकसभेच्या कोणत्या जागांवर आणि कोण उमेदवार आहे जाणून घ्या

RR vs KKR : कोलकाता-राजस्थान सामना पावसामुळे रद्द

सात्विक-चिराग जोडी विजेती ठरली, लिऊ आणि चेन यांना पराभूत केले

SRH vs PBKS : हैदराबादने पंजाबचा चार गडी राखून पराभव केला

पुढील लेख
Show comments