Festival Posters

पुन्हा एकदा मेघ गर्जनेसह पावसाचा अंदाज

Webdunia
शुक्रवार, 9 एप्रिल 2021 (08:02 IST)
येत्या दिवसांमध्ये राज्यात काही ठिकाणी मेघ गर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम अशा स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणाच्या काही भागात पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने वर्तवला आहे. त्यासोबतच विदर्भातही काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शुक्रवार ९ एप्रिल ते १२ एप्रिल दरम्यान हा पाऊस आणि गारपीटीचा अंदाज मांडण्यात आला आहे. या कालावधीत काही जिल्ह्यांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
 
शनिवार ते रविवार या कालावधीत राज्यात चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया याठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याठिकाणी गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर या ठिकाणी हलका ते मध्य स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या शुक्रवारी कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या भागात मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी उकाड्याचा पारा चढलेला असतानाच या अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे. तर काही ठिकाणी उकाड्यापासून काही कालावधीसाठी दिलासा मिळणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

२१ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरु, श्री गुरुदेव दत्तांची भक्ती आणि महालक्ष्मीची कृपादृष्टीचा काळ

Wedding Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी

एनआयटी नागपूरने रिक्त जागा जाहीर केल्या ,शिक्षकेतर पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

फक्त 10 मिनिटांत बनवा हे घरगुती केसांचे तेल, केस गळणे थांबेल

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 5 गोष्टी खा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र सरकारने राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली

मुंबईतील घाटकोपर येथे संध्याकाळच्या वॉकसाठी निघालेल्या वृद्ध व्यक्तीला रॉडने मारहाण करून हत्या

काँग्रेसने राज ठाकरेंशी युती नाकारली, कायदा मोडणाऱ्यांशी हातमिळवणी करणार नाही असे म्हटले

नांदेड: ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने ठोठवाली जन्मठेपेची कठोर शिक्षा

चंद्रपूर : कोचिंग स्टाफकडून सतत होणाऱ्या छळाला कंटाळून NEET च्या विद्यार्थ्यांची आत्महत्या

पुढील लेख
Show comments