Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सांगली जिल्हा न्यायालयात बनावट दस्तऐवज; दोघांवर गुन्हा

Webdunia
मंगळवार, 17 मे 2022 (08:29 IST)
बोगस व्यक्ती उभा करून जिल्हा न्यायालयात बनावट दस्तऐवज केल्याप्रकरणी इम्तियाज कोपळ व अल्ताफ खान (दोघे रा. हुबळी,जि. बेळगाव ) यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याबाबत मोहित धीरजकांत गुप्ता ( रा. शेवाळे गल्ली, खणभाग, सांगली) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित अल्ताप खान यास क्रशिंग मशीन घ्यायचे होते. यासाठी तो इम्तियाज कोपळ याला घेऊन विजयनगर येथील जिल्हा न्यायालयात आला होता. दोघांनी त्यांचे वकील सय्यद फकरुद्दीन यांना खोटी माहिती दिली.
 
फिर्यादी मोहित गुप्ता यांचे नाव सांगून संबंधित व्यक्ती हीच असल्याचे सांगितले, पण गुप्ता यांच्या जागी प्रत्यक्षात दुसरीच व्यक्ती उभा केली. गुप्ता यांच्या नावावर नोटरी तयार करून खोटा दस्तऐवज केला. त्यावर गुप्ता यांची बनावट सही पण केली. हा सारा प्रकार शनिवारी सकाळी दहा वाजता घडला. त्यांची ही बनावटगिरी कागदपत्रांची तपासणी करताना उघडकीस आली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अनेक महिने खराब होणार नाही मिठाई, या सोप्या टिप्स अवलंबवा

Healthcare Tips : दिवाळीच्या काळात दमा रुग्णांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी टिप्स

आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर दिवाळीत हे नक्की खरेदी करा

दिवाळीचे साप्ताहिक राशिभविष्य, जाणून घ्या या आठवड्यात कोणत्या राशींवर देवी लक्ष्मीची कृपा असेल 28 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2024

दिवाळीत या जीवांना पाहणे शुभ मानले जाते, जाणून घ्या काय महत्त्व

सर्व पहा

नवीन

40 हजारांहून अधिक मतदार 100 वर्षांपेक्षा जास्त वयाचे, निवडणूक आयोगाने मतदार यादी जाहीर केली

नवाब मलिक यांची मैदानातून हकालपट्टी करू शकतात अजित पवार, भाजपची नाराजी पाहून मूड बदलतोय !

'इम्पोर्टेड माल'वरून गोंधळ, शिवसेनेच्या उमेदवार शायना एनसी यांनी अरविंद सावंत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला

No shave November नो शेव्ह नोव्हेंबर म्हणजे काय, जो जगभरातील पुरुष साजरा करतात?

उद्या त्यांचा पक्ष फोडू शकतात, संजय राऊत यांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना सल्ला

पुढील लेख
Show comments