suvichar

माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांचे निधन

Webdunia
शुक्रवार, 22 डिसेंबर 2023 (20:06 IST)
social media
भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय नेते, धुळे मतदारसंघाचे माजी खासदार प्रतापदादा सोनवणे (वय 75) यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले.अतिशय लाघवी व मनमिळावू असलेल्या प्रतापदादा यांचा आज 75 वा वाढदिवस होता व आजच्या दिवशी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. प्रतापदादा सोनवणे हे जनसंघाचे जुने कार्यकर्ते होते. त्यांनी धुळे मतदारसंघाचे खासदार, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार, नाशिक मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सभापती, अध्यक्ष व चिटणीस म्हणून कामकाज केले आहे. त्यांचे वडील स्व.नारायण मन्साराम सोनवणे हे देखील बागलाण मतदार संघाचे आमदार होते.
 
त्यांच्या पश्चात पत्नी शोभाताई सोनवणे, मुलगी पल्लवी संतोष पाटील, सोनिया साकेत घोडके, मुलगा तुषार प्रताप सोनवणे व नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा डिसुझा कॉलनी, गंगापूर रोड येथील त्यांच्या 'कामधेनू' या निवासस्थानापासून दुपारी 3 वाजता निघाली.

Edited by -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

रेल्वे स्थानकावर मोठा अपघात; फोन हिसकावून पाळणाऱ्या व्यक्तीचा पाठलाग करताना २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू

२० लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी जीएसटी उपायुक्तांना अटक, सहाय्यक आयुक्त फरार

समृद्धी एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, ट्रकने चिरडून तीन कामगारांचा मृत्यू

प्रताप सरनाईक यांनी अर्थसंकल्पाला "विकसित महाराष्ट्र २०४७ साठी गुंतवणूक" असे संबोधले आहे

LIVE: प्रताप सरनाईक यांनी अर्थसंकल्पाला "विकसित महाराष्ट्र २०४७ साठी गुंतवणूक" असे संबोधले

पुढील लेख
Show comments