Festival Posters

बाप्पा निघाले : लालबाग राजा सह राज्यात विसर्जनाला उत्साह (photo)

Webdunia
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017 (13:46 IST)
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशी भावनिक  आवाहन करत आनंदात आणि उत्सहात  राज्यभरातील सार्वजनिक गणपतींना आज निरोप दिला जात आहे. तर पूर्ण राज्याचे लक्ष असलेला लाल बागचा राजा सुद्धा निघाला असून तर दुसरीकडे  मुंबईत पोलीस आणि महापालिकेकडून गणपती विसर्जनासाठी चौपाट्या तयार केल्या आहेत. राज्यात फक्त मुंबई  जवळपास  40 हजार पोलीस विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज आहेत. फक्त मुंबईत मोठ्या आणि छोटे अश्या  शंभर ठिकाणी गणेश विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. तसंच अनेक रस्त्यांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तर वाहतूक कोंडी होवू नये म्हणून   रस्त्यांवरची वाहतूक वळवण्यात येणार आहे.
 
सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे येथे सुद्धा मिरवणूक सुरु झाली आहे. यामध्ये आज विधिवत पूजा करत  पुण्यातील मानाच्या कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. तर विशेष म्हणजे यामध्ये  सुरेश कलमाडीही  सहभागी आहेत. तर दुसरीकडे पुणे पोलिसांनी अनेक बंदोबस्त केले आहेत. वाहतूक पोलिसांनीही वाहतुकीचे उत्तम नियोजन केलं आहे. 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. नियोजनासाठी विशेष रिंगरोड तयार केला आहे.
 
नाशिकचे मानाचे गणपती दुपारी मार्गस्त होणार आहेत. मात्र दुसरीकडे पोलिसांनी आणि महापालिकेने जोरदार तयारी केली आहे. गोदावरी प्रदूषण होवू नये म्हणून अनेक समाजसेवी संस्था पुढे आल्या आहेत. तर  पालिकेमार्फत शहरात सहा विभागांमध्ये एकूण 54 ठिकाणी गणेश मूर्ती संकलन व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये 26 नैसर्गिक विसर्जन ठिकाणे आणि 28 कृत्रिम तलाव आहेत.
 
सोलापुर येथे  गणेश विसर्जन उत्साहात सुरु आहे.  घरगुती गणरायाचं विसर्जन केरण्यात येत आहे.  दुपारनंतर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या जंगी मिरवणुका निघणार आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

अमेरिकेने व्हेनेझुएलावर मोठा लष्करी हल्ला केला, ट्रम्पचा दावा - मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अटक!

हिंदी विरुद्ध मराठी राजकारण तीव्र, बीएमसी निवडणुकीपूर्वी भाजपने हिंदी भाषिक मतपेढीवर लक्ष केंद्रित केले

BCCI ने घेतला मोठा निर्णय: मुस्तफिजुर रहमान IPL मधून बाहेर, केकेआर बदली खेळाडू शोधणार

मार्चमध्ये ५०० रुपयांच्या नोटा बंद होणार का? पीआयबीने सत्य उघड केले

LIVE: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला निवृत्त

पुढील लेख
Show comments