नाशिक मनपा घंटागाडी कर्मचाऱ्याने सुपरवायझरच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. किरण पुराने असे आत्महत्या केलेल्या घंटागाडी कर्मचाऱ्याचे नाव आहे. आज सकाळी ही घडल्यानंतर मृत घंटागाडी कर्मचाऱ्याचे नातेवाईक आक्रमक झाले. या नातेवाईकांनी संशयित निरीक्षकांना अटक करण्याची मागणी केली.
आत्महत्या करण्यापूर्वी किरण पुराने यांनी काही घंटागाडी निरीक्षकाने रकमेची मागणी करत असल्याचा संदेश व्हाट्सअपवर शेअर केला आहे. या जाचाला कंटाळून, मी हे कृत्य करतोय असे त्याने या संदेशात लिहिले असल्याचे बोलले जात आहे.किरण यांच्या भावानेही सुपरवायझरच्या आर्थिक जाचाला कंटाळून किरण याने आत्महत्या केल्याचा म्हटले आहे. तीन सुपरवायझरने त्याचा छळ केला. हे तिघेजण किरणकडून महिना पाच हजार असे बारा महिन्यांचे ६० हजार रुपयांची मागणी करत होते असाह आरोपही केला आहे.