Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हिंगोलीत मुलीचा विनयभंग, हिंदू संघटनांचा पोलीस ठाण्याच्या बाहेर गोंधळ

Webdunia
सोमवार, 16 सप्टेंबर 2024 (15:56 IST)
हिंगोलीच्या बसमत येथे एका महिलेचा रस्त्यात विनयभंग केला.पीडित महिला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला गेल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला.या घटनेची माहिती स्थानिकांना मिळतातच त्यांनी पोलीस ठाण्यासमोर गोंधळ घातला.या प्रकरणी तातडीने गुन्हा नोंदवून पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी करत रात्री उशिरा पर्यंत आंदोलन केले. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन देऊन नागरिकांना शांत केले. 

मिळालेल्या माहितीनुसार,पीडित महिला रविवारी संध्याकाळी भाजी घ्यायला गेली असता या वेळी इतर समाजाच्या दोन तरुणांनी तिचा विनयभंग केला. नंतर तरुणीने घरी आल्यावर घडलेले सांगितले. कुटुंबीयांनी तातडीनं पोलीस ठाणे गाठले. पीडितेची तक्रार नोंदवण्याऐवजी कारवाई करण्याचे आश्वासन देऊन पाठवून दिले.ही माहिती स्थानिकांना समजतातच हिंदू संघटनांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिया मांडून आरोपींच्या विरूद्ध कारवाई करण्याची मागणी केली. प्रकरण चिघळत असल्याचे पाहून पोलिसांनी तातडीनं आरोपींवर गुन्हा दाखल करून कारवाई सुरु केली आहे. 
Edited by - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला11 लाखांचे बक्षीस, शिवसेना आमदाराचे खळबळजनक वक्तव्य

विधानसभा निवडणुका दोन टप्प्यात होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत

World Ozone Day 2024: 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस का साजरा करतात जाणून घ्या

महाराष्ट्रात वीजपुरवठ्याची बोली अदानीने जिंकली, काँग्रेसचा महायुती सरकारवर आरोप

तवंदी घाटात अपघातात दोघांचा मृत्यू, 13 जखमी

पुढील लेख
Show comments