Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गोकुळ दूध संघाने दूध उत्पादकांना मोठा दिलासा देत ग्राहकांना झटका दिलाय

Webdunia
शुक्रवार, 9 जुलै 2021 (23:08 IST)
आता दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून घेण्यात येणाऱ्या दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची घोषणा गोकूळ दूध संघाचे नेते पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. 
 
त्यानुसार दूध संघ आता उत्पादक शेतकऱ्यांना म्हशीच्या दूध दरात लीटरमागे 2 तर गायीच्या दूधामागे 1 रुपयांनी खरेदी दरात वाढ देणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी ही येत्या 11 जुलैपासून करण्यात येणार आहे.  गोकूळ दूध संघाने व्यवस्थापण खर्चात कमी करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. 
 
एका बाजूला दूध संघाच्या निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. तर दुसऱ्या बाजूला ग्राहकांना महागाईची झळ सोसावी लागणार आहे. गोकूळने खरेदी दरासह दूध विक्री दरातही वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार आता राज्यात एक लीटर दूधामागे 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ कोल्हापुरचा अपवाद वगळता संपूर्ण राज्यात लागू असणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणीही 11 जुलैपासून करण्यात येणार आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच अमूलनेही दूध दरात वाढ केली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bornahan बोरन्हाण साठी लागणारे साहित्य आणि विधी

Gajanan Maharaj Durvankur गजानन महाराज दुर्वांकुर

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

रिकाम्या पोटी चहा प्यायलात तर हे जाणून घ्या, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

जर तुम्हाला कोरडी त्वचा टाळायची असेल तर हे सोपे घरगुती उपाय लगेच वापरून पहा

सर्व पहा

नवीन

सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे वक्तव्य समोर आले

26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस : महाभारत आणि बौद्ध काळात पण लोकतंत्र होते का?

LIVE: सैफ प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवारांचे वक्तव्य समोर

60 वर्षीय वृद्धाने अल्पवयीन मुलीसोबत दुष्कर्म केल, न्यायाधीशांनी ठोठावला 12 वर्षाचा कारावास

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सैफ अली खान प्रकरणात चिंता व्यक्त केली

पुढील लेख
Show comments