Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Gova :शिक्षकाला वर्गाबाहेरच विद्यार्थ्यांसमोर बेदम मारहाण

Gova  :शिक्षकाला वर्गाबाहेरच विद्यार्थ्यांसमोर बेदम मारहाण
, बुधवार, 24 ऑगस्ट 2022 (11:06 IST)
गोव्यातील एका शिक्षकाला वर्गाबाहेरच बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. घटना 18 ऑगस्टची असल्याचं सांगितलं जात आहे.या घटनेचा व्हिडिओ शाळेत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.एका  PWD अभियंत्यानी वालपोई येथे असलेल्या एका शाळेतील शिक्षकांला मारहाण केली. मारहाणीमागचं कारण अद्याप समजू शकलं नाही.
 
या प्रकरणात PWD अभियंत्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आलं आहे. अल्ताफ शेख असं या अभियंत्याचं नाव आहे. ही संपूर्ण घटना शाळेतील एका सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.व्हिडिओमध्ये तो गोव्यातील एका शाळेतील शिक्षकाला मारहाण करताना दिसत आहे.
 
व्हिडिओमध्ये हा अभियंता वर्गाच्या बाहेर उभा आहे. तो हा शिक्षक वर्गातून बाहेर येण्याची वाट बघत आहे. इतक्यात हा शिक्षक बाहेर येतो. हे पाहाताच अभियंता त्याच्या अंगावर धावून जातो आणि मारहाण करण्यास सुरुवात करतो. तो सुरुवातीला शिक्षकाच्या कानशिलात लगावतो आणि नंतर त्याला बाजूला खेचून बेदम मारहाण करतो. 
 
काहीच वेळात इतर लोक या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी तिथे येतात आणि अभियंत्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात. काही विद्यार्थीही बाहेर येऊन हा सगळा प्रकार पाहात आहेत. मात्र, तो अभियंता कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. भरपूर गर्दी जमा झाल्यावरही हा व्यक्ती शिक्षकाला शेवटपर्यंत मारत राहातो. मारहाणीचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आलं असून पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गौतम अदानी बनले एनडीटीव्हीचे सर्वांत मोठे भागधारक