Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरकारकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आवाहन

Webdunia
गुरूवार, 22 जून 2017 (11:52 IST)

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्यासाठी जुलैच्या वेतनातून राज्य कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान द्यावं, असं आवाहन राज्य सरकारने केलं आहे. याबाबतचं परिपत्रकही जारी करण्यात आलं आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या मदतीसाठी राज्य सरकारी, निमसरकारी, महामंडळ यातील अधिकारी, कर्मचारी, तसेच आयएएस, आयपीएस, फॉरेस्ट ऑफिसर हे क्लास वन वर्गातील अधिकारी देखील जुलै -2017 च्या वेतनातील एक दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी देणार आहेत.  दुष्काळामुळे अडचणीत सापडलेला शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब आणि त्यांच्या मुलांचं शिक्षण होण्यासाठी राज्य सरकारने निधी उभारण्याचं नियोजन केलं आहे. मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, भारतीय प्रशासकीय सेवा आणि भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांनाही जुलै महिन्यातील एक दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान याबाबत सक्ती करण्यात आलेली नसून हा विषय ऐच्छिक असल्याचंही परिपत्रकात म्हटलं आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीवर कोहलीचे विधान,काम पूर्ण झाल्यावर मी निघून जाईन

फिलिपाइन्स ने नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा चीनचा इशारा

World Telecommunication Day 2024 :हा दिवस कधी आणि कसा सुरू झाला इतिहास जाणून घ्या

World Hypertension Day 2024 : जागतिक उच्च रक्तदाब दिवसकधी आणि का साजरा केला जातो, जाणून घ्या

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

पुढील लेख
Show comments