Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुन्हा वादाचा भोवऱ्यात, महापुरुषांचा एकेरी उल्लेख केला

Webdunia
रविवार, 8 जानेवारी 2023 (12:04 IST)
गेले काही महिने राज्यपाल विविध वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात आहेत. राज्यपालांना हटवण्याची मागणी विरोधी पक्षाकडून होते आहे.महापुरुषांच्या अपमान केल्याबद्दल त्यांना हटवण्याची मागणी विरोधी पक्षाकडून केली जात आहे. आपल्या वक्तव्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. मुंबईत एका कार्यक्रमात राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि इतर महापुरुषांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे ते पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडले आहे.मुंबईत राजभवनात एका कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी म्हणाले.

"राज्यपाल बनने से दुख ही दुख है, सुख तो कुछ भी नहीं है. मात्र असे लोक येतात तेव्हा कधी कधी बरं वाटतं. मी आता 80 वर्षांचा झालोय, त्यामुळे मी तर काही आता मुमुक्षरत्न नाही बनू शकत. अशा लोकांजवळ येतो तेव्हा त्यांचा सुगंधही लागतो. जैन तीर्थ सर्कीट बनवलंय. सरकारला आवाहन आहे, पर्यटन मंत्रायलासोबतच तीर्थक्षेत्राचं मंत्रालयही व्हावं. सर्वच मुमूक्षू, मुनी राज्यपाल बनू शकत नाहीत,"मुंबईतल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबईच्या कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. 
 
 
राज्यपालांकडून महापुरुषांचे एकेरी उल्लेख केल्या बद्दल अमोल मिटकरी म्हणाले की पुन्हा एकदा राज्यपालांकडून मुंबई येथे राजभवनातील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि इतर महापुरुषांचा एकेरी उल्लेख केला अखेर राज्यपालांच्या मनात चाललंय तरी काय? .
 
आता तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत खुलासा करतील का? असा प्रश्न अमोल मिटकरींनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे.
 
Edited By - Priya Dixit 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments