Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नारायण राणेंना मोठा दिलासा: आधी न्यायालयीन कोठडी,नंतर जामीन मिळाला

Webdunia
बुधवार, 25 ऑगस्ट 2021 (11:33 IST)
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे रात्री उशिरा जामीन मिळाला.अटकेनंतर त्यांना रायगडमधील महाड येथील दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले.त्यानंतर राणे यांच्या वकिलांनी तातडीने जामीन अर्ज दाखल केला.नारायण राणे यांच्या वकिलांनी त्यांच्या प्रकृतीचा हवाला देत जामिनासाठी अपील केले होते, जे न्यायालयाने मान्य केले.न्यायालयाने त्यांना 15,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडले.त्याचबरोबर कोर्टाने त्यांना 31 ऑगस्ट आणि 13 सप्टेंबरला चौकशीसाठी पोलीस स्टेशन येण्यास सांगितले आहे.त्याचबरोबर भविष्यात पुन्हा अशा गुन्ह्याची पुनरावृत्ती न करण्याच्या सूचना न्यायालयाने त्यांना दिल्या आहेत.नारायण राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी याबाबत माहिती दिली. 

महाड दंडाधिकारी न्यायालयाने 15,000 रु वैयक्तिक रोखे सादर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरुद्ध त्यांचा आरोप विधान संबंधात वर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जामीन मंजूर केला आहे
 
सुनावणीच्या वेळी पत्नी आणि मुलगाही उपस्थित होते.
नारायण राणे यांना अटक केल्यानंतर त्यांना रिमांडसाठी महाड दंडाधिकारी न्यायालयात नेण्यात आले. राणे यांना येथे दंडाधिकारी बाबासाहेब शेख पाटील यांच्या खंडपीठात हजर करण्यात आले.या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान, यांचे पुत्र आमदार नितेश राणे, आणि नारायण राणे यांच्या पत्नी नीलिमा देखील न्यायालयात उपस्थित होत्या. न्यायालयाने त्यांना आधी न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले होते.पण नारायण राणे यांच्या वकीलांनी लगेच जामिनासाठी अर्ज दाखल केला.त्यानंतर न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला.यापूर्वी प्रोटोकॉलनुसार राज्यसभा अध्यक्ष कार्यालयाला नारायण राणे यांच्या अटकेची अधिकृत माहिती देण्यात आली होती.
 
 जामीन मंजूर करताना (केंद्रीय मंत्री नारायण राणे) न्यायालयाने काही अटी घातल्या आहेत-ते  31 ऑगस्ट आणि 13 सप्टेंबर रोजी चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये हजर राहतील आणि भविष्यातअशा प्रकारचा गुन्हा करणार नाही: नारायण राणे यांचे वकील संग्राम देसाई.
 
केंद्रीय मंत्री राणे यांनी सोमवारी रायगड जिल्ह्यातील जन आशीर्वाद यात्रेदरम्यान कथितपणे म्हटले की, "मुख्यमंत्र्यांना स्वातंत्र्य मिळून किती वर्षे झाली हे माहीत नाही हे लज्जास्पद आहे." भाषणादरम्यान ते मागे वळून याविषयी विचारताना दिसले. मी तिथे असतो तर मी त्यांच्या कानशिलात दिली असती.15 ऑगस्ट रोजी जनतेला संबोधित करताना राणे यांनी दावा केला की, मुख्यमंत्री स्वातंत्र्याची किती वर्षे पूर्ण झाली हे विसरले होते.ते म्हणाले की भाषणाच्या मध्यभागी ते त्यांच्या सहकाऱ्यांना विचारत होते की स्वातंत्र्य दिनाला किती वर्षे झाली आहेत. हे उल्लेखनीय आहे की राणेंच्या विरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात चार एफआयआर नोंदवण्यात आले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महिलां विरोधातील टिप्पणी महागात पडणार!

महाराष्ट्र सरकारने तरुणांसाठी लाडला भाऊ योजना सुरू केली, माहिती जाणून घ्या

माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी आज 97वर्षांचे झाले.पंतप्रधान मोदी माजी राष्ट्रपती कोविंद यांनी दिल्या शुभेच्छा

भाजपच्या पोस्टरवरून एकनाथ शिंदे गायब, कांग्रेसने लगावला टोला

20 नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी शेअर मार्केट बंद राहील

पुढील लेख
Show comments